Bluetooth Earaphones: 60 तासांच्या अवाढव्य बॅटरी लाईफसह boAt चे इयरफोन्स लाँच; किंमत देखील परवडणारी 

By सिद्धेश जाधव | Published: December 2, 2021 03:23 PM2021-12-02T15:23:13+5:302021-12-02T15:24:41+5:30

Bluetooth Earphones boAt Rockerz 330 Pro: boAt Rockerz 330 Pro सिंगल चार्जमध्ये 60 तासांचा बॅटरी बॅकअप देतात असा दावा कंपनीनं केला आहे. कंपनीनं यात मॅग्नेटिक इयरबड्स, Bluetooth 5.2, IPX5 वॉटर रेजिस्टन्स आणि फास्ट चार्जिंग फिचरसह सादर करण्यात आले आहेत.

Boat rockerz 330 pro launched in india with battery life of upto 60 hours   | Bluetooth Earaphones: 60 तासांच्या अवाढव्य बॅटरी लाईफसह boAt चे इयरफोन्स लाँच; किंमत देखील परवडणारी 

Bluetooth Earaphones: 60 तासांच्या अवाढव्य बॅटरी लाईफसह boAt चे इयरफोन्स लाँच; किंमत देखील परवडणारी 

Next

Bluetooth Earphones boAt Rockerz 330 Pro: boAt नं भारतात एक नवीन नेकबँड boAT Rockerz 330 Pro नावानं सादर केला आहे. या Bluetooth Earphones ची खासियत म्हणजे हे इयरफोन्स सिंगल चार्जवर  60 तासांपर्यंतची बॅटरी लाईफ देऊ शकतात. कंपनीनं यात मॅग्नेटिक इयरबड्स, Bluetooth 5.2, IPX5 वॉटर रेजिस्टन्स आणि फास्ट चार्जिंग फिचरसह सादर करण्यात आले आहेत.  

boAt Rockerz 330 Pro ची किंमत  

boAt Rockerz 330 Pro ची किंमत फक्त 1,499 रुपये ठेवण्यात आली आहे. तुमही हे इयरफोन्स अ‍ॅमेझॉन इंडियावरून विकत घेऊ शकता. तसेच कंपनीच्या वेबसाईटवर देखील हे इयरफोन्स ब्लॅक, ब्लू, पर्पल आणि रेड कलर्समध्ये उपलब्ध आहेत. लाँच ऑफर अंतर्गत, प्रत्येक 60व्या ग्राहकाला 100 टक्के कॅशबॅक आणि टॉप 60 ग्राहकांना एपी ढिल्लों मर्चन्डाईज देण्यात येईल. 

boAT Rockerz 330 Pro चे स्पेसिफिकेशन्स 

boAt Rockerz 330 Pro मध्ये 10mm डायनॅमिक ड्रायव्हर्सचा वापर करण्यात आला आहे. तसेच चांगल्या साउंड क्वॉलिटीसाठी कंपनीनं ENx टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. वेगवान कनेक्टिव्हिटीसाठी कंपनीनं या डिवाइसमध्ये ब्लूटूथ 5.2 दिली आहे. हे नेकबँड सिंगल चार्जवर 60 तासांचा बॅटरी बॅकअप देतात. तसेच यातील फास्ट चार्जिंग फिचर फक्त 10 मिनिटांच्या चार्जमध्ये 20 तासांचा प्लेबॅक देऊ शकतात. BoAT Rockerz 330 Pro ला पाणी आणि घामापासून वाचवण्यासाठी IPX5 रेटिंग देण्यात आली आहे. हे हलके इयरफोन्स मॅग्नेटिक इयरबड्ससह सादर करण्यात आले आहेत.  

Web Title: Boat rockerz 330 pro launched in india with battery life of upto 60 hours  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.