स्वस्त boAt Watch Xtend स्मार्टवॉच लाँच; SpO2, हार्ट रेट मॉनिटरिंगसह मिळणार 7 दिवसांचा बॅटरी बॅकअप  

By सिद्धेश जाधव | Published: July 7, 2021 04:20 PM2021-07-07T16:20:11+5:302021-07-07T16:21:14+5:30

boAt Watch Xtend price: boAt ने आपला बजेट स्मार्टवॉच boAt Watch Xtend सादर आहे. या वॉचमध्ये विविध हेल्थ मॉनिटरिंग फीचर्ससह बिल्ट इन Alexa व्हॉइस असिस्टंट सपोर्ट मिळतो.  

boat-watch-xtend-launched-price-specifications  | स्वस्त boAt Watch Xtend स्मार्टवॉच लाँच; SpO2, हार्ट रेट मॉनिटरिंगसह मिळणार 7 दिवसांचा बॅटरी बॅकअप  

स्वस्त boAt Watch Xtend स्मार्टवॉच लाँच; SpO2, हार्ट रेट मॉनिटरिंगसह मिळणार 7 दिवसांचा बॅटरी बॅकअप  

Next

boAt ने स्मार्टवॉच कॅटेगरीमध्ये आपला बजेट स्मार्टवॉच boAt Watch Xtend भारतात लाँच केला आहे. या स्मार्टवॉचमध्ये बिल्ट इन Alexa व्हॉइस असिस्टंट सपोर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर विविध हेल्थ मॉनिटरिंग फीचर्स देखील देण्यात आले आहेत. Alexa व्हॉइस असिस्टंटच्या मदतीने फक्त बोलून अलार्म सेट करणे इत्यादी व्हॉइस कमांड देता येतील. boAt Watch Xtend स्मार्टवॉच 2,999 रुपयांमध्ये Amazon India वर खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे.(Boat Watch Xtend Price In India Launch Specifications Features Design) 

boAt Xtend चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स 

boAt Xtend मध्ये 1.69 इंचाचा एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले ऑटो ब्राईटनेस फिचरला सपोर्ट करतो. या स्मार्टवॉचमध्ये 50 पेक्षा जास्त Watch Faces आहेत. या बजेट स्मार्टवॉचमध्ये 5ATM वॉटर रेजिस्टन्स फीचर देखील देण्यात आले आहे.  

boAt Watch Xtend मध्ये SpO2 (रक्तातील ऑक्सीजन स्थर) मॉनिटरिंग आणि हार्ट रेट मॉनिटरिंग फीचर देण्यात आला आहे. हा स्मार्टवॉच युजरची झोपेसोबत इनडोर वॉकिंग, हायकिंग, योगा, इनडोर रनिंग, आउटडोर वॉकिंग, वर्कआउट, सायकलिंग, पूल स्विमिंग, रोइंग, ओपन वॉटर स्विमिंग, स्पिनिंग बाईक, आउटडोर रनिंग, क्रिकेट असे 14 स्पोर्ट्स मोड ट्रॅक करतो. त्याचबरोबर यात Find My Phone, DND, म्यूजिक कंट्रोल, वेदर अपडेट्स सारखे फीचर्स मिळतात. यातील 300mAh ची बॅटरी एकदा फुल चार्ज केल्यावर 7 दिवस वापरता येते.  

Web Title: boat-watch-xtend-launched-price-specifications 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.