2000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत वॉटरप्रूफ Smartwatch, सिंगल चार्जवर 7 दिवस चालणार
By सिद्धेश जाधव | Published: March 30, 2022 12:52 PM2022-03-30T12:52:46+5:302022-03-30T12:52:55+5:30
boAt Wave Lite स्मार्टवॉच भारतात लाँच झालं आहे. यात 24/7 हार्ट रेट ट्रॅकर, ब्लड ऑक्सीजन लेव्हल आणि स्लिप ट्रॅकर असे हेल्थ फीचर्स देण्यात आले आहेत.
boAt Wave Lite स्मार्टवॉच भारतात लाँच झालं आहे. यात 24/7 हार्ट रेट ट्रॅकर, ब्लड ऑक्सीजन लेव्हल आणि स्लिप ट्रॅकर असे हेल्थ फीचर्स देण्यात आले आहेत. अॅमेझॉनवरून या स्मार्टवॉचची किंमत समजली आहे. हे नवीन नवीन स्मार्टवॉच तुम्ही 1,999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. या वॉचची विक्री 31 मार्चला दुपारी 12 वाजता सुरु करण्यात येईल. अॅमेझॉनवर boAt Wave Lite चे ब्लॅक, ब्लू आणि रेड कलर व्हेरिएंट उपलब्ध होतील.
Boat Wave Lite चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
बोट व्हेव लाईटमध्ये 1.69-इंचाची चौकोनी स्क्रीन देण्यात आली आहे. जी 500nits ब्राईटनेस आणि 160-डिग्री व्यूइंग अँगलला सपोर्ट करतात. याची डिजाईन अशी आहे की याच स्मार्टवॉचचं वजन फक्त 44.8 ग्राम आहे. यातील फीचर्स आणि अन्य गोष्टी अॅक्सेस करण्यासाठी कंपनीनं बाजूला रोटेटिंग क्राउन दिला आहे.
या बोट वॉचमधील 100 पेक्षा जास्त वॉच फेस तुम्हाला कस्टमायजेशनमध्ये मदत करतात. यात 24/7 हार्ट रेट ट्रॅकर, ब्लड ऑक्सीजन लेव्हल आणि स्लिप ट्रॅकिंग असे हेल्थ फीचर्स देण्यात आले आहेत. boAt Wave Lite मध्ये दहा स्पोर्ट्स मोड मिळतात, ज्यात धावणे, चालणे, सायकलिंग, योग, फुटबॉल, बॅडमिंटन, बास्केटबॉल, स्किपिंग, हायकिंग आणि स्विमिंगचा समावेश आहे. यात Google Fit आणि Apple Health इंटीग्रेशन सपोर्ट मिळतो. सिंगल चार्जवर बोट वेव लाईट 7 दिवस चालू शकतात. असा दावा कंपनीनं केला आहे. हे स्मार्टवॉच IP67 डस्ट आणि वॉटर-रेजिस्टन्ससह बाजारात आलं आहे.