मस्तच! ट्रेनच्या किमतीत विमानाने प्रवास करता येणार, करा फक्त ही ट्रिक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 04:42 PM2022-11-29T16:42:37+5:302022-11-29T16:42:44+5:30

कोरोना संकटानंतर आता दोन वर्षानंतर पुन्हा सर्व सुरू झाले आहे, ट्रेनने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

book flight ticket in train ticket price only on rs 1 aassurance plan | मस्तच! ट्रेनच्या किमतीत विमानाने प्रवास करता येणार, करा फक्त ही ट्रिक

मस्तच! ट्रेनच्या किमतीत विमानाने प्रवास करता येणार, करा फक्त ही ट्रिक

googlenewsNext

कोरोना संकटानंतर आता दोन वर्षानंतर पुन्हा सर्व सुरू झाले आहे, ट्रेनने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लग्न समारंभही उत्साहात केली जात आहेत. त्यामुळे आता रेल्वेचेतिकिट कन्फर्म होणे कठिण झाले आहे, काहीवेळी तिकिट कन्फर्म न झाल्यामुळे गोंधळ होतो. आता ट्रेनचे तिकिट कन्फर्म झाले नाहीतर घाबरण्याची गरज नाही. कारण तुम्हाला ट्रेनच्या किमतीत आता विमानाने प्रवास करता येणार आहे. 

जर तुमचे ट्रेन तिकीट कन्फर्म झाले नसेल तर तुम्हाला त्याऐवजी 1 रुपयात विमान तिकीट ऑफर केले जाईल. यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही.

तुमच्या फोनचं Bluetooth नेहमी ऑन असतं? कॉलवरचं तुमचं संभाषण ऐकू शकतात हॅकर्स!

यासाठी तुम्हाला ट्रेनमॅन अॅपद्वारे ट्रेनचे वेटिंग तिकीट बुक करावे लागेल. यासाठी रेल्वे तिकीट बुक करताना 1 रुपयाचा ट्रिप अॅश्युरन्स प्लॅन घ्यावा लागेल. यामध्ये रेल्वेचे तिकीट कन्फर्म न झाल्यास हमखास विमान तिकीट उपलब्ध आहे, जेणेकरून ट्रेनची वेटिंग लिस्ट कन्फर्म न झाल्यास प्रवाशाचे फ्लाइट तिकिटात रूपांतर केले जाईल. ज्या शहरात विमानतळ नाही त्यांच्यासाठी ही ऑफर लागू होणार नाही. या अॅपच्या मदतीने राजधानीसह 130 ट्रेनमध्ये तिकीट बुक करता येणार आहेत.

ट्रेनच्या तिकीट बुकिंगचा अंदाज 90 टक्के असल्यास, 1 रुपयाची हमी योजना घ्यावी लागेल. जर ट्रेन बुकिंग अंदाज कमी असेल तर वेगवेगळ्या क्लासनुसार वेगळे शुल्क भरावे लागतील.

ट्रेनचे तिकीट कन्फर्म झाल्यास, ट्रिप अॅश्युरन्स चार्ज परत केला जाईल. तिकीट कन्फर्म न झाल्यास, त्या मार्गावरील विमानाचे तिकीट कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय प्रवाशाला मोफत दिले जाणार आहे. यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाहीत. 

ट्रेनमॅन हे ऑनलाइन तिकीट बुकिंग अॅप आहे. या अॅपने ट्रिप अॅश्युरन्स फीचर लाँच केले आहे. ट्रेनमॅन अॅप 2016 मध्ये लाँच करण्यात आले होते.

Web Title: book flight ticket in train ticket price only on rs 1 aassurance plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.