सततच्या चार्जिंगला कंटाळलायत?; ४० तासांपर्यंत चालणार हे स्वस्त आणि मस्त Earbuds
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 03:41 PM2022-01-13T15:41:20+5:302022-01-13T15:41:50+5:30
Boult Audio AirBass Y1 : कंपनीनं गुरुवारी लाँच केले, सर्वाधिक बॅटरी लाईफ देणारे स्वस्त आणि मस्त Earbuds.
Boult Audio AirBass Y1 : वारंवार Earbuds चार्ज करुन कंटाळला आहात? आणि जर तुम्ही असे इयरबड्स शोधत असाल जे तुम्हाला सतत चार्च करावे लागणार नाहीत, तर Boult चे इयरबड्स तुम्हाला नक्कीच फायद्याचे ठरतील. कंपनीने गुरुवारी त्यांचे नवीन Boult Audio AirBass Y1 इयरबड्स भारतात लॉन्च केले आहेत. नवे AirBass Y1 TWS इयरबड्स देशात कंपनीच्या TWS इयरफोन लाइनअपमध्ये लेटेस्ट एडिशन आहेत आणि ४० तास बॅटरी, तसंच फास्ट चार्जिंग ही त्याची खासीयत आहे.
कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार ग्राहकांना सिंगल-चॅनल ऑडिओसोबत सिंगल इयरबडवर कॉलिंग आणि गाण्याचाही आनंद लुटता येणार आह. नवे इयरबड्स एक अँगल्ड डिझाइनला सपोर्ट करतात. तसंच वॉटर आणि स्वेट रेझिस्टन्ससाठी त्याला IPX5 रेटिंग देण्यात आलंय. Boult AirBass Y1 ची किंमत केवळ १२९९ रुपये इतकी आहे. ब्लॅक आणि व्हाईट कलर ऑप्शनमध्ये हे इयरबड्स उपलब्ध असतील. तसंच सध्या फ्लिपकार्टच्या माध्यमातून हे खरेदी करता येऊ शकतात. याशिवाय Boult AirBass Y1 वर ज्यांच्याकडे अॅक्सिस बँकेचं क्रेडिट कार्ड असेल त्यांच्यासाठी ५ टक्के सूटही मिळणार आहे.
Boult Audio AirBass Y1 चे बेसिक स्पेक्स
इयरबड्समध्ये अँगल्ड डिझाईन आणि ABS बॉडी मिळते. कंपनीनं AirBass Y1 यात वापरण्यात आलेल्या ड्रायव्हर्सबद्दल कोणताही खुलासा केलेला नाही. वायरलेस इयरबड्स चार्जिंगसह ४० तासांपर्यंत प्लेबॅक देतं. तसंच केवळ १० मिनिटं चार्ज केल्यानंतर यात १०० मिनिटांचा प्लेबॅक मिळत असल्याचा दावाही करण्यात आला आहे. याशिवाय हे इयरबड्स मोनोपॉड मोडवरही वापरता येऊ शकतात.
हे मीडिया प्लेबॅक आणि कॉल घेण्यासोबतच ब्लूटूथ ५.१ सपोर्ट आणि टच कंट्रोलसह येतात. याशिवाय TWS इयरबड्स ट्रिपल टॅप जेस्चरसह गुगल असिस्टंस आणि सिरीही सपोर्ट करत असल्याचं कंपनीनं म्हटलंय.