32 तासांचा बॅटरी बॅकअप आणि दमदार साउंड क्वॉलिटीसह AirBass GearPods TWS लाँच
By सिद्धेश जाधव | Published: October 1, 2021 06:27 PM2021-10-01T18:27:42+5:302021-10-01T18:27:50+5:30
Boult AirBass GearPods TWS मध्ये कंपनीने डीप बेससाठी 8mm च्या ड्रायव्हर्स आणि मायक्रो-वूफर्सचा वापर केला आहे.
Boult ने आपले नवीन ट्रू वायरलेस इयरबड्स भारतात सादर केले आहेत. इन-इयर डिजाईनसह कंपनीने AirBass GearPods TWS इयरबड्स लाँच केले आहेत. 32 तासांचा बॅटरी बॅकअप देणारे हे बड्स लाँच ऑफर अंतर्गत 999 रुपयांमध्ये विकत घेता येतील. हे बड्स ब्लू, ब्लॅक आणि वाइट कलर ऑप्शनमध्ये लवकरच फ्लिपकार्टवरून विकत घेता येतील.
Boult AirBass GearPods TWS चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
कंपनीने यात डीप बेससाठी 8mm च्या ड्रायव्हर्स आणि मायक्रो-वूफर्सचा वापर केला आहे. हे इयरबड्स IPX5 वॉटर रेजिस्टन्ससह सादर करण्यात आले आहेत. कनेक्टिविटीसाठी यात ब्लूटूथ व्हर्जन 5.1 मिळते. यातील टच कंट्रोलच्या मदतीने इयरबड्स नियंत्रित करता येतात. यात कॉल रिसिव्ह किंवा रिजेक्ट करणे, वॉल्यूम अडजस्ट करणे, आणि म्यूजिक कंट्रोल्सचा देखील समावेश आहे. तसेच यात व्हॉईस असिस्टंट सपोर्ट देखील देण्यात आला आहे.
चार्जिंग केससह या बड्सचे वजन 41 ग्राम आहे. यात कॉलिंगसाठी बिल्ट इन माईक देखील देण्यात आला आहे. सिंगल चार्जमध्ये हे बड्स 8 तास वापरता येतात. तसेच चार्जिंग केसची जोड मिळाल्यावर बॅटरी लाइफ 32 तासांवर जाते. चार्जिंगसाठी केसमध्ये यूएसबी टाइप टाइप-C पोर्ट मिळतो. फक्त 10 मिनिटांच्या चार्जिंगने हे बड्स 100 मिनिटांचा म्युजिक प्लेबॅक देतात, असा दावा कंपनीने केला आहे.