Brazil Fined Apple: iPhone 14च्या लॉन्चिगपूर्वी Appleला मोठा झटका; 'या' देशाने लावला 18 कोटींचा दंड...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 06:54 PM2022-09-07T18:54:01+5:302022-09-07T18:56:24+5:30
Brazil Fined Apple: एका चुकीमुळे Apple वर कोट्यवधी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
iPhone Sale Ban in Brazil: जगभरात Apple च्या Far Out Event बाबत जोरदार चर्चा असून, गेल्या अनेक दिवसांपासून लोक याची वाट पाहत आहेत. या कार्यक्रमात iPhone 14 लॉन्च होणार आहे. पण, आता याच्या काही तासांपूर्वीच कंपनीला जोरदार झटका लागला आहे. एका चुकीमुळे कंपनीला कोट्यवधी रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. या चुकीमुळे अनेक ग्राहक त्रस्त असून, अनेक देशांमध्ये कंपनीला विरोधाचा सामना करावा लागला आहे.
कंपनील कोट्यवधीचा दंड
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीला हा दंड ब्राझीलमध्ये (Brazil) लागला आहे. iPhone 14 च्या लॉन्चिंगपूर्वी ब्राझीलनेअॅपलवर 2.3 मिलीयन डॉलर्सचा दंड ठोठावला आहे. हा दंड ठोठावण्याचे कारण म्हणजे, अॅपलने देशात त्यांच्या iPhones सोबत चार्जर दिला नाही. ब्राझीलच्या Ministry of Justice and Public Security (MJSP) ने Apple वर हा $2.3 मिलियन(सूमारे 18 कोटी)चा दंड लावला आहे.
ब्राझीलने केली मोठी घोषणा
Appleवर चार्जरशिवाय iPhone विकण्यासाठी दंड ठोठावण्यासोबतच ब्राझील सरकारने अजून एक निर्णय दिला. सरकारने चार्जरशिवाय विकल्या जाणाऱ्या सर्व iPhones च्या विक्रीवर बंदी घातली आहे. (iPhones Sale Suspended in Brazil) MJSP ने iPhone 12 च्या रेजिस्टरेशनलाही रद्द केले आहे. ब्राझीलने 2021 मध्येही Appleवर दोन मिलीयन डॉलर्सचा फाइन लावला होता. तेव्हाही कंपनीने चार्जरशिवाय iPhone विकण्याची घोषणा केली होती. विशेष म्हणजे, iPhone 14 सीरीज आज 7 सप्टेंबर, 2022 रोजी रात्री 10:30 वाजता लॉन्च होणार आहे.