BSNL चा शानदार प्लॅन! 499 रुपयांमध्ये 90 दिवसांसाठी मिळेल Unlimited Data, Calls, SMS
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 17:35 IST2022-05-17T17:32:47+5:302022-05-17T17:35:54+5:30
BSNL : या प्लॅनमध्ये अनलिमिडेट कॉल आणि एसएमएस सर्व उपलब्ध असतील.

BSNL चा शानदार प्लॅन! 499 रुपयांमध्ये 90 दिवसांसाठी मिळेल Unlimited Data, Calls, SMS
नवी दिल्ली : बीएसएनएलने (BSNL) युजर्ससाठी एक नवीन प्लॅन आणला आहे. बीएसएनएलने 499 रुपयांचा नवीन प्लॅन आणला आहे. या प्लॅनमध्ये युजर्सच्या सर्व गरजांची काळजी घेण्यात आली आहे. 499 रुपयांच्या प्लॅनची वैधता 90 दिवस आहे. यासोबतच युजरला दररोज 2 जीबी डेटा आणि 100 एसएमएस मिळतात. म्हणजेच या प्लॅनमध्ये कंपनी तुम्हाला एकूण 180GB डेटा देते.दरम्यान, हा प्लॅन खरेदी केल्यानंतर तुम्हाला कोणत्याही OTT प्लॅटफॉर्मचा अॅक्सेस मिळत नाही. तर या प्लॅनमध्ये अनलिमिडेट कॉल आणि एसएमएस सर्व उपलब्ध असतील.
BSNL 87 रुपयांचा प्लॅन
बीएसएनएलच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या प्लॅनपैकी एक 87 रुपयांचा प्लॅन देखील आहे. कमी किंमतीसह, तुम्हाला इतर सर्व फायदे देखील मिळतात. बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 1 GB हाय-स्पीड इंटरनेट मिळेल. या प्लॅनची वैधता 14 दिवसांची आहे आणि त्यानुसार हा प्लॅन घेतल्यावर तुम्हाला 14GB डेटा मिळेल.
या प्लॅनची डेटा मर्यादा संपल्यानंतरही तुम्हाला इंटरनेट सुविधा मिळेल. मात्र, इंटरनेटचा वेग 40kbps इतका कमी होईल. या प्लॅनमध्ये कॉलिंग आणि एसएमएस संबंधी सर्व सुविधा तशाच राहतील. या प्लॅनप्रमाणेच तुम्हाला 14 दिवसांसाठी अनलिमिडेट कॉल्स आणि एसएमएस मिळतात. हा प्लॅन बीएसएनएलच्या सर्वात स्वस्त प्लॅन मध्ये गणला जातो.
BSNL 1,499 रुपयांचा प्लॅन
बीएसएनएलच्या 1,499 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिडेट कॉल, एसएमएस आणि डेटा दिला जातो. यामध्ये तुम्हाला 24GB डेटा दिला जात आहे. हा प्लॅन खरेदी करणे देखील योग्य असेल कारण ही वैधता 365 दिवसांसाठी आहे. म्हणजेच एकदा रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला वर्षभर काळजी करण्याची गरज नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला वर्षभर कॉलिंग, इंटरनेट आणि एसएमएसची सुविधा मिळेल.