BSNL 5G: मोठी बातमी! येत्या 5-7 महिन्यात BSNL 5G सुरू होणार; केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 02:34 PM2022-12-09T14:34:18+5:302022-12-09T14:38:49+5:30
Indian Telecom Industry: केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी BSNL च्या ग्राहकांना मोठी बातमी दिली आहे.
Indian Telecom Industry: Jio आणि Airtel सारख्या दिग्गज खाजगी दूरसंचार कंपन्यांनी देशातील काही ठराविक शहरांमध्ये 5G सेवा सुरू केली आहे. विशेष म्हणजे, दोन्ही कंपन्यांनी पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत देशभरात 5G सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीत, 4G पेक्षा 5G रिचार्ज महाग होईल अशी भीती अनेकांना वाटत आहे. दरम्यान, केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सरकारी मालकीच्या BSNL च्या ग्राहकांना मोठी बातमी दिली आहे.
There is no other way to transform the country without transforming the Railways, affecting practically each and every aspect of our life, whether it is cargo or the people movement. ~ @AshwiniVaishnaw, Hon'ble Minister, @RailMinIndia, Communications, @GoI_MeitY at #CIIGEPS2022pic.twitter.com/MOvlu4ta0Y
— Confederation of Indian Industry (@FollowCII) December 8, 2022
1.35 लाख टॉवरमध्ये 5G सुरू होणार
उद्योग संस्था CII च्या एका कार्यक्रमात दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) म्हणाले की, बीएसएनएलचे देशभरात सुमारे 1.35 लाख मोबाइल टॉवर आहेत. या टॉवर्समध्ये लवकरच 5-जी सेवा सुरू केली जाणार आहे. येत्या 5-7 महिन्यांत 4G आधारित तंत्रज्ञान 5G वर अपडेट केले जाईल. याला चालना देण्यासाठी दूरसंचार तंत्रज्ञान विकास निधी (TTDF) वार्षिक 500 कोटींवरून 4,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याची सरकारची योजना आहे.
बीएसएनएल मजबूत स्थितीत असेल
कोटक बँकेचे सीईओ उदय कोटक यांनी दूरसंचार उद्योगातील बीएसएनएलच्या भूमिकेबद्दल विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात वैष्णव म्हणाले की, दूरसंचार क्षेत्रात बीएसएनएल खूप मजबूत स्थितीत असेल. बीएसएनएलचे देशभरात सुमारे 1.35 लाख मोबाइल टॉवर आहेत. यामुळेच कंपनीचे ग्रामीण भागात खूप मजबूत अस्तित्व आहे. अनेक भागांमध्ये इतर दूरसंचार कंपन्या अद्याप पोहोचू शकलेल्या नाहीत. पण, बीएसएनएल सर्वत्र आहे.