BSNLचा भन्नाट प्लॅन! 90 दिवसांपर्यंत दररोज मिळणार 5GB डेटा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2020 11:56 AM2020-07-05T11:56:20+5:302020-07-05T12:03:55+5:30
भारत संचार निगम लिमिटेड (बीएलएनएल) नवीन ‘वर्क फ्रॉम होम’ प्लॅन युजर्ससाठी आणला आहे.
मुंबई : भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी अनेकजण घरीच बसून आहेत. तर काही लोक घरातून काम (वर्क फ्रॉम होम) करत आहेत. यापार्श्वभूमीवर लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर आता भारत संचार निगम लिमिटेड (बीएलएनएल) नवीन ‘वर्क फ्रॉम होम’ प्लॅन युजर्ससाठी आणला आहे.
कंपनीने नवीन 599 रुपयांचा प्रीपेड एसटीव्ही प्लॅन आणला असून यामध्ये रिचार्च केल्यानंतर युजर्सला 5 जीबी डेटा मिळणार आहे.
बीएसएनएल कंपनीचा 599 रुपयांचा वर्क फ्रॉम होम एसटीव्ही प्लॅन युजर्स देशात कुठेही रिचार्ज करू शकतात. संपूर्ण देशभरात हा प्लॅन उपलब्ध आहे. 599 रुपयांचे प्रीपेड एसटीव्ही या प्लॅनमधून रिचार्ज केल्यावर ग्राहकाला दररोज 5 जीबीचा डेटा दिला जाणार आहे.
या बीएसएनएलच्या नव्या 599 रुपयांच्या प्लॅनची मर्यादा 90 दिवसांची आहे. त्यासोबत यामध्ये फ्री व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएसही दिले जाणार आहे.याआधीही बीएसएनएलने 551 रुपयांचा प्लॅन बाजारात आणला होता. पण, त्या प्लॅनचा फायदा केवळ आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील युजर्सला मिळत होता.
अनलिमिटेड फ्री कॉलिंग
गेल्या 551 रुपयांच्या प्लॅनमध्ये फक्त डेटा दिला जात होता. मात्र, आता 599 रुपयांचा नवीन प्लॅन एसटीव्हीला अनलिमिटेड कॉम्बो प्लॅन म्हणून घोषित केले आहे. या प्लॅनच्या माध्यमातून देशभरात सर्व नेटवर्क्सवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगचा पर्याय दिला आहे. यामध्ये दररोज 250 मिनिट युजर्सला मिळणार आहे. तसेच, 5 जीबी हायस्पीड डेटा आणि 100 फ्री एसएमएसही ऑफर करण्यात आले आहेत.
एकूण 450 जीबी हाय स्पीड डेटा
बीएसएनएलच्या या नव्या प्लॅनच्या मदतीने देशभरातील सर्व सर्कल्समध्ये रिचार्ज केला जाऊ शकतो. 5 जीबी हायस्पीड डेटा संपल्यानंतर स्पीडमध्ये घट होऊन 80 केबीपीएस राहणार आहे. त्यामुळे या प्लॅनला वर्क फ्रॉम होम म्हटले आहे. कारण, यामध्ये खूप डेटा दिला आहे. 90 दिवसांच्या मर्यादेमध्ये 450 डेटा युजर्सला मिळणार आहे.
आणखी बातम्या....
मुंबई, ठाण्यासह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरुच, सतर्कतेचा इशारा
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येवरुन उसळलेल्या वादावर राज ठाकरेंचा खुलासा, म्हणाले...
कॅश काढल्यास भरावा लागेल टॅक्स; नियम समजावण्यासाठी आयकर विभागानं आणलं कॅलक्युलेटर
आठ पोलिसांची हत्या करणाऱ्या विकास दुबेविरोधात सरकारची कारवाई, जेसीबीने पाडले घर
नवज्योतसिंग सिद्धू पुन्हा कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या कॅबिनेटमध्ये? ऊर्जामंत्री होण्याची शक्यता
TikTok सारखं भारतीय Moj अॅप; अवघ्या दोन दिवसांत हजारो युजर्स