BSNL ने वाढवली Jio, Airtel, VI ची चिंता; इंटरनेट युजर्ससाठी आणले स्वस्त प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 02:46 PM2024-09-03T14:46:23+5:302024-09-03T14:46:46+5:30
आता बीएसएनएलनेही ब्रॉडबँड सेवेत मोठी एंट्री केली आहे.
जिओ, एअरटेल आणि व्ही या टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत वाढ केली आहे. या टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्जमध्ये जवळपास १५ टक्क्यांनी वाढ केली. यानंतर, अनके युजर्स बीएसएनएलकडे (BSNL) वळत असल्याचा रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला. कारण, बीएसएनएलचे रिचार्ज प्लॅन स्वस्त आहेत. यातच आता बीएसएनएलनेही ब्रॉडबँड सेवेत मोठी एंट्री केली आहे.
जिओ आणि एअरटेलला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलने आपल्या प्लॅनच्या किंमतीत लक्षणीय घट केली आहे. बीएसएनएलने अलीकडेच आपली फायबर ब्रॉडबँड सेवा स्वस्त केली आहे. बीएसएनएलने २४९ रुपये, २९९ रुपये आणि ३२९ रुपयांच्या प्लॅनची किंमत लक्षणीयरीत्या कमी केली आहे. आज आम्ही तुम्हाला हीच माहिती देणार आहोत. हे तुम्हाला ते कसे वापरता येईल हे समजून घेणे अधिक सोपे करेल.
बीएसएनएल ब्रॉडबँड प्लॅन २४९ रुपयांपासून सुरू होतात. या सुरुवातीच्या प्लॅनमध्ये, आधी १० Mbps स्पीड दिला जात होता, पण आता तो २५ Mbps इतका वाढवला आहे. इतर दोन प्लॅन रुपये २९९ आणि ३२९ रुपये आहेत. या दोन्ही प्लॅनमध्ये तुम्हाला २५ Mbps चा स्पीड देण्यात येत आहे. तर याआधी या प्लॅनमध्ये १० Mbps आणि २० Mbps स्पीड देण्यात येत होता.
हे प्लॅन फेअर यूसेज पॉलिसी (FUP) सह येतात. २४९ रुपयांचा प्लॅन १० GB फेअर यूसेज पॉलिसी ऑफर करतो, तर २९९ रुपयांचा प्लान २० GB फेअर यूसेज पॉलिसी ऑफर करतो. फेअर यूसेज पॉलिसी मर्यादा गाठल्यानंतर स्पीड २ Mbps पर्यंत कमी होईल. ३२९ रुपयांचा प्लॅन १००० GB फेअर यूसेज पॉलिसीसह येतो. यानंतर स्पीड कमी होऊन ४ Mbps होईल.
जर तुम्ही बीएसएनएल नेटवर्कवर स्विच करण्याचा विचार करत असाल, तर सर्वात आधी तुम्हाला बीएसएनच्या नेटवर्कची उपलब्धता तपासली पाहिजे. जर बीएसएनएल नेटवर्क तुमच्या शहरात उपलब्ध असेल तर तुम्ही ते वापरू शकता. दरम्यान, बीएसएनएल नेटवर्क दिल्ली आणि आजूबाजूच्या भागात उपलब्ध आहे, परंतु असे अनेक क्षेत्र आहेत, जिथे बीएसएनएल नेटवर्क अद्याप उपलब्ध नाही. अशा स्थितीत खरेदी करण्यापूर्वी संपूर्ण माहिती घ्यावी.