BSNL चा 91 रुपयांचा सर्वात स्वस्त प्लॅन, मिळेल 90 दिवसांची व्हॅलिडिटी; पाहा फायदे...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2024 04:20 PM2024-09-29T16:20:54+5:302024-09-29T16:21:07+5:30

BSNL Cheapest Plan: BSNL चा 91 रुपयांचा सर्वात स्वस्त प्लॅन, मिळेल 90 दिवसांची व्हॅलिडिटी; पाहा फायदे...

BSNL Cheapest Plan: BSNL's cheapest plan of Rs 91, with 90 days validity; See the benefits... | BSNL चा 91 रुपयांचा सर्वात स्वस्त प्लॅन, मिळेल 90 दिवसांची व्हॅलिडिटी; पाहा फायदे...

BSNL चा 91 रुपयांचा सर्वात स्वस्त प्लॅन, मिळेल 90 दिवसांची व्हॅलिडिटी; पाहा फायदे...

BSNL Cheapest Plan: खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी त्यांचे रिचार्ज प्लॅन महाग केले आहेत, तेव्हापासून सरकारी कंपनी बीएसएनएलचे अच्छे दिन सुरू झाले आहेत. जुलैमध्ये खासगी कंपन्यांनी केलेल्या दरवाढीनंतर लाखो ग्राहकांनी Jio-Airtel आणि Vi सोडून BSNL मध्ये सीम पोर्ट केले. या महिन्यात तर 29 लाखांहून अधिक ग्राहकांनी BSNL चे सिम घेतले आहे. विशेष म्हणजे, BSNL देखील आणखी ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी नवनवीन स्वस्त प्लॅन्स लॉन्च करत आहे. आता कंपनीने आणखी एक स्वस्त प्लॅन लॉन्च केला आहे.

BSNL ने आपल्या पोर्टफोलिओमध्ये मोठा बदल केला आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने अनेक स्वस्त प्लॅन्स आणले आहेत. आता बीएसएनएलने असा प्लॅन आणला आहे, ज्याद्वारे ग्रुहकांना अतिशय कमीत किमतीत आपले सिमकार्ड सुरू ठेवता येईल. विशेष म्हणजे, सर्वच कंपन्यांनी सध्या सिम कार्ड सुरू ठेवण्यासाठी किमान रक्कम आकारणे सुरू केले आहे. या बाबतीत BSNL खुप स्वस्त प्लॅन ऑफर करत आहे.

BSNL चा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन
BSNL च्या ग्राहकांना 91 रुपयांचा स्वस्त प्लॅन मिळेल. या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना 90 दिवसांची वैधता मिळते. यामध्ये तुम्हाला इतर कुठलेही फायदे मिळत नाहीत, कारण हा फक्त व्हॅलिडिटी प्लॅन आहे. यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची कॉलिंग, एसएमएस किंवा डेटा मिळत नाही. तुम्हाला तुमचे सिम कमीत कमी खर्चात, जास्तीत जास्त दिवस ॲक्टिव्ह ठेवायचे असेल, तर हा प्लॅन तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकतो. तुम्हाला कॉलिंगची सुविधा हवी असेल, तर तुम्ही या 91 रुपयांच्या प्लॅनसह टॉकटाइम व्हाउचर प्लॅन घेऊ शकता.

Web Title: BSNL Cheapest Plan: BSNL's cheapest plan of Rs 91, with 90 days validity; See the benefits...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.