बीएसएनएलचा ग्राहकांना जोराचा झटका; तब्बल 60 दिवसांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 10:18 AM2020-01-27T10:18:20+5:302020-01-27T10:20:48+5:30
बीएसएनएलच्या 1188 चा प्रिपेड प्लॅनला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.
सरकारी कंपनी भारत संचार निगम लिमिटेडने लोकप्रिय झालेला जास्त अवधीच्या प्लॅनमध्ये मोठा बदल केला आहे. यामुळे ग्राहकांना जोरदार झटका बसला आहे. जिओ, व्होडाफोनसारख्या कंपन्यांनी दर वाढविल्यानंतर आम्ही वाढविणार नाही असे सांगणाऱ्या बीएसएनएलने दर कमी न करता मोठी खेळी केली आहे.
बीएसएनएलच्या 1188 चा प्रिपेड प्लॅनला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. 345 दिवसांची व्हॅलिडीटी असलेला हा प्लॅन होता. मात्र, ही मुदतच बीएसएनएलने तब्बल 45 दिवसांनी कमी केली आहे. म्हणजेच ग्राहकांना आता केवळ 300 दिवसांचीच मुदत मिळणार आहे.
बीएसएनएलने हा प्लॅन सबस्क्राईब करण्याची मुदत 90 दिवसांनी वाढविली आहे. हा प्लॅन युजर 31 मार्च पर्यंतच घेऊ शकणार आहेत. हा प्लॅन बेसिक युजरसाठी होता. यामध्ये ग्राहकांना प्रती दिन डेटा दिला जात नव्हता. बीएसएनएल 1999 आणि 1699 च्या प्रीपेड प्लॅन्समध्ये 365 दिवसांची व्हॅलिडीटी देण्यात आली आहे. यामध्ये डेटाही देण्यात येत आहे. बीएसएनएलने 1188 चा प्लॅन खासकरून एअरटेल आणि व्होडाफोनच्या 1499 रुपयांच्या प्लॅनसाठी लाँच केला होता.
तोट्यातली बीएसएनएल नव्या व्यवसायात; महाराष्ट्रातून नशीब आजमावणार
#SwitchToBSNL महाराष्ट्रात सर्वाधिक ट्रेंड; 1699 चा आकडा ठरला शुभ
या प्लॅनद्वारे 345 दिवसांची व्हॅलिडिटी दिली होती. तसेच हा प्लॅन घेतल्यावर आणखी 20 दिवसांची व्हॅलिडिटी देण्यात येत होती. मात्र, आता 345 पैकी 45 दिवसच कमी केल्याने ग्राहकांचे एकूण 60 दिवसांचे नुकसान झाले आहे.