BSNLच्या 'या' ग्राहकांना मिळणार अनलिमिटेड डेटा, कॉलिंग आणि SMSची सुविधा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 04:16 PM2019-05-29T16:16:22+5:302019-05-29T16:17:34+5:30
प्लॅनची मर्यादा 30 दिवसांची असून याची किंमत 389 रुपये इतकी आहे.
नवी दिल्ली : टेलिकॉन क्षेत्रातीव सरकारी कंपनी भारत संचार निगम लिमिडेट (BSNL) कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन रिचार्ज प्लॅन बाजारात आणला आहे. हा प्लॅन खासकरुन विदेशी किंवा अशा ग्राहकांसाठी आहे, जे कमी मर्यादा असलेले प्लॅन घेऊ शकतात. या प्लॅनची मर्यादा 30 दिवसांची असून याची किंमत 389 रुपये इतकी आहे. यामध्ये ग्राहकांना व्हाइस कॉल, डेटा आणि एसएमएसचा फायदा घेता येणार आहे. हा प्लॅन केवळ चेन्नई आणि तामिळनाडूमधील ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.
389 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन : BSNL च्या या प्लॅनची मर्यादा 30 दिवसांची आहे. यामध्ये रोमिंग कॉल्स कंपनीच्या स्टँडर्ड प्रति मिनिट प्लॅनच्या दरानुसार चार्ज लावले जाणार आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 1 जीबी हाय-स्पीड डेटा दरदिवशी दिला जाणार आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आहे. रोजचा डेटा संपल्यानंतर डाटा स्पीड 40kbps होणार आहे. याशिवाय दिवसाला 100 एसएमएस करता येणार आहेत. दरम्यान, हा प्लॅन अन्य सर्कल्समध्ये आणला जाणार आहे की नाही, याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.
याशिवाय, BSNLने आपल्या 47 आणि 198 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनला रिव्हाइज केले आहे. 47 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 1 जीबी डेटा प्रतिदिन मिळणार आहे. अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉल्स सुद्धा देण्यात येत आहेत. या प्लॅनची मर्यादा 9 दिवसांची आहे. तर, 198 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 2 जीबी डेटा दर दिवशी मिळणार आहे. या प्लॅनची मर्यादा 54 दिवसांची आहे.
याआधी आंध्र प्रदेश आणि तेलंगना सर्कलमधून BSNLने 10 आणि 20 रुपयांचा टॉकटाइम रिचार्ज प्लॅन हटविला होता. BSNLने आपल्या ऑनलाइन पोर्टलवरुन 10 आणि 20 रुपयांचा प्लॅन काढून टाकला आहे. मात्र, ग्राहक फिजिकल व्हाऊचर्स घेऊन रिचार्ज करु शकतात. अर्थात आंध्र प्रदेश आणि तेलंगना सर्कल सोडून ग्राहक आता सुद्धा प्रीपेड कनेक्शन रिचार्ज करु शकतात.