BSNLचा 'रक्षाबंधन' धमाका; कॉल-डेटा-SMS अनलिमिटेड
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 14:57 IST2018-08-25T14:57:32+5:302018-08-25T14:57:59+5:30
सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएल(BSNL)ने रक्षाबंधन सणानिमित्त ग्राहकांसाठी एक विशेष ऑफर आणली आहे. बीएसएनएलने 'STV399' असा एक नवीन प्लॅन बाजारात आणला आहे.

BSNLचा 'रक्षाबंधन' धमाका; कॉल-डेटा-SMS अनलिमिटेड
नवी दिल्ली : सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएल(BSNL)ने रक्षाबंधन सणानिमित्त ग्राहकांसाठी एक विशेष ऑफर आणली आहे. बीएसएनएलने 'STV399' असा एक नवीन प्लॅन बाजारात आणला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉइस, डेटा आणि एसएमएस करण्याचा फायदा घेता येणार आहे. या प्लॅनची किंमत 399 रुपये इतकी आहे. तसेच, या प्रीपेड प्लॅनमध्ये 74 दिवसांची मर्यादा देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, बीएसएनएलचा हा नवीन प्लॅन दिल्ली आणि मुंबई टेलिकॉम सर्कलमध्ये लागू आहे. याशिवाय यामध्ये Personalized Ring Back Tone(PRBT) चा फायदा सुद्धा ग्राहकांना मिळणार आहे. त्यामुळे ग्राहकांना अनलिमिटेड साँग बदलण्यासाठी ऑप्शन मिळणार आहे. 'STV399' हा प्लॅन 26 ऑगस्ट म्हणजेच रक्षाबंधन या सणादिवशी ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. तसेच, टेलिकॉमटॉकच्या वृत्तानुसार, बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि एसएमएस करण्याचा फायदा घेता येणार आहे.
दरम्यान, गेल्या स्वातंत्र्य दिनानिमित्त बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये प्रीपेड ग्राहकांना व्हाईस आणि डेटा या सुविधा दिल्या होत्या. या ऑफरमध्ये 9 आणि 29 रुपयांचा प्लॅन आणला होता. या दोन्ही प्लॅनला फ्रीडम ऑफर असे नाव दिले होते.