BSNL आणि MTNL युजर्ससाठी चांगली बातमी, लवकरच सुरू होणार 4G सर्व्हिस
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 16:53 IST2025-02-10T16:52:38+5:302025-02-10T16:53:06+5:30
भारत संचार निगम लिमिटेड लवकरच दिल्ली आणि मुंबईतील एमटीएनएल भागातही 4G सर्व्हिसचा विस्तार केला जाणार आहे.

BSNL आणि MTNL युजर्ससाठी चांगली बातमी, लवकरच सुरू होणार 4G सर्व्हिस
नवी दिल्ली : बीएसएनएल (BSNL) आणि एमटीएनएलच्या (MTNL) युजर्सना लवकरच 4G सर्व्हिस मिळू शकते. सरकारने या दोन्ही टेलिकॉम कंपन्यांसाठी तिजोरी उघडली आहे. भारत संचार निगम लिमिटेड लवकरच दिल्ली आणि मुंबईतील एमटीएनएल भागातही 4G सर्व्हिसचा विस्तार केला जाणार आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनीला सहा हजार कोटी रुपयांचे अतिरिक्त पॅकेज जाहीर केले आहे. हे पॅकेज सरकारी टेलिकॉम कंपनीच्या 4G नेटवर्क विस्तारासाठी वापरले जाईल. दरम्यान, बीएसएनएल संपूर्ण भारतात वेगाने 4G मोबाईल टॉवर बसवत आहे. अलीकडेच, कंपनीने देशभरात 65 हजारांहून अधिक नवीन 4G मोबाइल टॉवर्स सुरू केले आहेत. कंपनीचे उद्दिष्ट वर्षाच्या पहिल्या सहामाहीत 1 लाख 4G मोबाईल टॉवर्स सुरू करण्याचे आहे.
बीएसएनएलच्या 4G सर्व्हिसच्या लाँचिंगसह, 4G ची चाचणी देखील सुरू होईल. कंपनीने यासाठी टाटा कंपनीसोबत भागीदारी केली आहे. सरकारकडून मिळालेल्या सहा हजार कोटी रुपयांच्या अतिरिक्त पॅकेजचा वापर भारतात 4G नेटवर्क विस्तारासाठी केला जाईल. गेल्या वर्षी सरकारने अर्थसंकल्पात बीएसएनएलला 80 हजार कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. या बजेटचा वापर सरकारी दूरसंचार कंपनीच्या सर्व्हिसला रिव्हाईल करण्यासाठी केला जाईल.
गेल्या वर्षी जुलैमध्ये खाजगी टेलिकॉम कंपन्यांचे रिचार्ज प्लॅन महाग झाल्यानंतर लाखो युजर्सनी आपले नंबर बीएसएनएलकडे पोर्ट केले होते, परंतु खराब नेटवर्क कव्हरेजमुळे 3 महिन्यांनंतर युजर्स पुन्हा एकदा खाजगी कंपन्यांकडे वळले आहेत. सरकारी टेलिकॉम कंपनी आपले युजर्स टिकवून ठेवण्यासाठी आपले नेटवर्क वेगाने वाढवत आहे.