BSNL चा 'हा' प्लॅन Airtel, Jio ला देईल धक्का; कमी खर्चात मिळेल ८२ दिवसांची व्हॅलिटिडी 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 03:01 PM2024-09-13T15:01:05+5:302024-09-13T15:02:51+5:30

BSNL : बीएसएनएलने ८२ दिवसांची व्हॅलिटिडी असलेला स्वस्त प्लॅन आणला आहे.

bsnl new recharge plan is headache for airtel jio vi with 82 days validity  | BSNL चा 'हा' प्लॅन Airtel, Jio ला देईल धक्का; कमी खर्चात मिळेल ८२ दिवसांची व्हॅलिटिडी 

BSNL चा 'हा' प्लॅन Airtel, Jio ला देईल धक्का; कमी खर्चात मिळेल ८२ दिवसांची व्हॅलिटिडी 

सरकारी कंपनी बीएसएनएलने (BSNL) पुन्हा एकदा एअरटेल (Airtel), जिओ (Jio) आणि व्ही ( Vi) ला चांगलाच धक्का दिला आहे. बीएसएनएल आपल्या स्वस्त रिचार्ज प्लॅनद्वारे ग्राहकांना आकर्षित करत आहे. इतकेच नाही तर टेलीकॉम कंपनीची ४ जी आणि ५ जी सेवा देखील लवकरच सुरू होणार आहे. ज्यामुळे ग्राहकांना सुपरफास्ट कनेक्टिव्हिटी देखील मिळणार आहे. 

बीएसएनएलचे रिव्हाइव्ह करण्यासाठी सरकारनेही मोठी योजना आखली आहे. मोबाईल ग्राहकांना चांगली कनेक्टिव्हिटी देण्यासाठी हजारो नवीन मोबाइल टॉवर्सही बसवले जात आहेत. सर्व काही सुरळीत झाल्यास, पुढील वर्षाच्या पहिल्या सहामाहीत देशभरातील ग्राहकांना बीएसएनएल ४ जी सेवा मिळणं सुरू होईल.

दरम्यान, सध्या बीएसएनएलने ८२ दिवसांची व्हॅलिटिडी असलेला स्वस्त प्लॅन आणला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटासोबतच मोठ्या व्हॅलिडिटीचाही लाभ मिळतो. बीएसएनएलचा हा रिचार्ज प्लॅन ४८५ रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सला दररोज १.५ जीबी डेटाचा फायदा मिळणार आहे. याशिवाय, ग्राहकांना देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड फ्री कॉलिंगचा लाभही दिला जात आहे. तसेच, दररोज १०० फ्री एसएमएसही मिळतील. बीएसएनएलचा हा स्वस्त रिचार्ज प्लॅन फ्री नॅशनल रोमिंगसह येतो. 

इतकेच नाही तर दिल्ली आणि मुंबईच्या एमटीएनएल (MTNL) नेटवर्कमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटाचा लाभही यूजर्सना मिळत राहील. बीएसएनएलचा हा रिचार्ज प्लॅन कंपनीच्या सेल्फ केअर ॲपवर लिस्ट आहे. तुम्ही बीएसएनएल ग्राहक असाल तर तुमच्या स्मार्टफोनवर BSNL Self Care ॲप डाउनलोड करा. यानंतर, तुमचा मोबाइल नंबर आणि ओटीपी वापरून ॲपमध्ये लॉग इन करा. येथे तुम्हाला होम पेजवर हा पॉकेट फ्रेंडली प्लॅन दिसेल. हा प्लॅन निवडून तुम्ही तुमचा नंबर रिचार्ज करू शकता.

बीएसएनएल-एमटीएनएल ५ जी टेस्टिंग सुरू
बीएसएनएल आणि एमटीएनएल लवकरच आपल्या ग्राहकांना दुहेरी आनंद देणार आहेत. सरकारने या दोन कंपन्यांसाठी ५ जी टेस्टिंग सुरू केली आहे. बीएसएनएल आणि एमटीएनएलची ५ जी सेवा पूर्णपणे मेड इन इंडिया नेटवर्क इक्विपमेंटच्या माध्यमातून सुरू केली जाईल. तसेच, या दोन्ही सरकारी दूरसंचार कंपन्यांची ५ जी चाचणी दूरसंचार विभाग आणि C-DoT घेत आहे.

Web Title: bsnl new recharge plan is headache for airtel jio vi with 82 days validity 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.