BSNL ची भन्नाट ऑफर! ५९९ रुपयांत मिळवा प्रतिदिन ५ जीबी डेटा आणि अनलिमिडेट कॉलिंग

By देवेश फडके | Published: January 16, 2021 04:58 PM2021-01-16T16:58:14+5:302021-01-16T17:00:14+5:30

वास्तविक पाहता व्होडाफोन-आयडिया, एअरटेल आणि जिओ या कंपन्यांचेही ५९९ रुपयांचे प्लान आहेत. मात्र, तरीही BSNL चा प्लान वेगळा ठरत आहे. 

bsnl offers 5 gb daily data and unlimited voice calling in just 599 rupees | BSNL ची भन्नाट ऑफर! ५९९ रुपयांत मिळवा प्रतिदिन ५ जीबी डेटा आणि अनलिमिडेट कॉलिंग

BSNL ची भन्नाट ऑफर! ५९९ रुपयांत मिळवा प्रतिदिन ५ जीबी डेटा आणि अनलिमिडेट कॉलिंग

Next
ठळक मुद्दे५९९ रुपयांच्या प्रीपेड रिजार्जवर BSNL कडून उत्तम ऑफरअनलिमिडेट व्हॉइस कॉल, एसएमएस आणि ५ जीबी डेटा प्रतिदिन अन्य कंपन्यांच्या तुलनेत BSNL चा प्लान ठरतोय सरस

नवी दिल्ली : भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने ग्राहकांसाठी अगदी हटके प्लान आणला आहे. ५९९ रुपयांच्या रिचार्जवर 'बीएसएनएल'कडून उत्तम सुविधा दिल्या जात आहेत. वास्तविक पाहता व्होडाफोन-आयडिया, एअरटेल आणि जिओ या कंपन्यांचेही ५९९ रुपयांचे प्लान आहेत. मात्र, तरीही BSNL चा प्लान वेगळा ठरत आहे. 

BSNL च्या ५९९ रुपये किमतीचा प्लान 2G, 3G आणि 4G यापैकी कोणत्याही नेटवर्कवर वापरला जाऊ शकतो. या प्लानमध्ये युझर्संना प्रतिदिन ५ जीबी डेटा दिला जातो. एकूण ८४ दिवस वैधता असलेल्या प्लॅनमध्ये ग्राहकाला तब्बल ४२० जीबी डेटा वापरायला मिळतो. याशिवाय अनलिमिटेड व्हॉइस कॉल, प्रतिदिन १०० एसएमएस अशा अन्य काही सुविधा BSNL कडून देण्यात येतात. 

Jio चाही ५९९ रुपयांचा प्रीपेड प्लान ऑफर केला जातो. मात्र, त्यात केवळ २ जीबी डेटा दिला जातो. Vi च्या ५९९ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये १.५ जीबी डेटा दिला जातो. तर, Airtel कडून ५९८ रुपयांमध्ये उपलब्ध असलेल्या प्रीपेड रिचार्ज प्लानमध्ये १.५ जीबी डेटा दिला जातो. सदर कंपन्यांच्या या प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे. 

प्रीपेड रिचार्ज प्लानचा एकूण आढावा घेतल्यास ५९९ रुपयांच्या प्लानमध्ये BSNL बाजी मारत असून, व्होडाफोन-आयडिया, एअरटेल आणि जिओ कंपन्यांच्या तुलनेत BSNL ग्राहकांना प्रतिदिन तब्बल ५ जीबी डेटा दिला जात आहे. तसेच सर्व नेटवर्कवर ही सुविधा BSNL कडून उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Web Title: bsnl offers 5 gb daily data and unlimited voice calling in just 599 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.