BSNLच्या ग्राहकांना मिळतेय मोफत अॅमेझॉन प्राईम मेंबरशिप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2018 05:53 PM2018-10-01T17:53:01+5:302018-10-01T17:55:24+5:30
बीएसएनएलने आपल्या ग्राहकांना एक वर्षासाठी मोफत अॅमेझॉन प्राईम मेंबरशिप देण्याचा निर्णय घेतला आहे. मोबाईल आणि लॅण्डलाइन ग्राहकांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. बीएसएनएलने आपल्या ग्राहकांना एक वर्षासाठी मोफत अॅमेझॉन प्राईम मेंबरशिप देण्याचा निर्णय घेतला आहे. मोबाईल आणि लॅण्डलाइन ग्राहकांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, BSNL Amazon Prime ऑफर फक्त नवीन अॅमेझॉन प्राईम ग्राहकांसाठीच आहे. सध्याचे अॅमेझॉन प्राईम मेंबर्स या ऑफरचा फायदा आपल्या करंट प्राईम मेंबरशिप संपल्यावर घेऊ शकतात. एका वर्षासाठी अॅमेझॉन प्राईम सब्सक्रिप्शनची फी 999 रुपये आहे. 399 रुपयांपेक्षा जास्त सर्व पोस्टपेड आणि 745 रुपयांपेक्षा जास्त सर्व लॅण्डलाइन पोस्टपेड प्लॅनवर सुद्धा ही ऑफर मिळणार आहे.
BSNL-Amazon Prime Offer मध्ये काय मिळणार?
अॅमेझॉन प्राईम मेंबरशिपमध्ये लेटेस्ट सिनेमा आणि टीव्ही शो साठी अनलिमिटेड स्ट्रीमिंग मिळणार आहे. याशिवाय अॅमेझॉन इंडियावरुन शॉपिंग करण्यासाठी मोफत डिलिव्हरी आणि एक्सक्लुसिव्ह डील्सच्या ऑफर मिळणार आहेत. विशेष म्हणजे, अनलिमिडेट ऑफलाइन डाऊनलोड्ससोबत ग्राहकांना अॅड-फ्री म्युजिकची मजा घेऊ शकतात.
BSNL-Amazon Prime offer साठी असे करा साइनअप...
1) मोबाईल ग्राहकांनी 399 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीचा पोस्टपेड प्लॅन आणि लॅण्डलाइन ब्रॉडबॅण्ड ग्राहकांनी 745 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीचा प्लॅन घ्यावा.
2) BSNL च्या वेबसाइटवर 'BSNL-Amazon offer' असा बॅनर असेल. त्यावर क्लिक करा.
3) वन टाइम पासवर्ड (ओटीपी) साठी आपला BSNL चा नंबर इंटर करा. त्यानंतर आपला ई-मेल आयडी द्यावा. सर्कल सिलेक्ट करुन पुन्हा कोड इंटर करा.
4) एकदा अॅक्टिव्ह झाल्यानंतर तुम्ही प्राईम व्हिडीओ आणि अॅमेझॉन म्युझिक अॅपचा फायदा घेऊ शकता.