BSNL OTT Plans for TV: बघुन बघुन घेतले...! बीएसएनएलने धमाकेदार प्लॅन लाँच केला, 250 रुपयांत 9 OTT ची मजा...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 03:01 PM2023-01-21T15:01:34+5:302023-01-21T15:04:39+5:30
युजर्सना वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन वेगवेगळे घ्यावे लागत होते. यामुळे कंपन्यांनी कमी किंमतीत ही ओटीटी उपलब्ध केली होती.
मोबाईल रिचार्ज आणि ब्रॉडबँड प्लॅन्ससोबत आता ओटीटी अॅप्सचा अॅक्सेस देणे सामान्य बनले आहे. परंतू जिओने आता ते फारच कमी केलेले असताना एवढे दिवस सुस्त पडून असलेल्या सरकारी कंपनी बीएसएनएलने धमाकाच केला आहे.
युजर्सना वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन वेगवेगळे घ्यावे लागत होते. यामुळे कंपन्यांनी कमी किंमतीत ही ओटीटी उपलब्ध केली होती. प्रत्येकाची अॅप्स आणि डील वेगवेगळी होती. यामुळे ज्यांना जे नकोय ते देखील घ्यावे लागत होते. असे असूनही कंपन्या हे कॉम्बो प्लॅन ऑफर करत होते.
बीएसएनएलच्या पोर्टफोलिओमध्येही असेच काही प्लॅन्स आहेत. यात या प्लॅनमध्ये यूजर्सना 9 OTT प्लॅटफॉर्मची मजा घेता येणार आहे. यासाठी तुम्हाला २४९ रुपये खर्च करावे लागतील. हा प्लॅन्स सामान्य नाही तर ब्रॉडबँड रिचार्ज प्लॅनसह उपलब्ध करण्यात आली आहे.
ZEE5, SonyLIV, Voot Select, Yupp TV, aHa, Lionsgate Play, Hungama, Disney + Hotstar सारख्या अॅप्सचा अॅक्सेस मिळणार आहे. या बंडल रिचार्जसाठी बीएसएनएलने Yupp TV Scope सोबत करार केला आहे. या अॅपला सर्व मोबाईलवर डाऊनलोड करता येते. महत्वाचे म्हणजे तुम्ही टीव्ही, मोबाईल किंवा लॅपटॉपवर कंटेंट पाहू शकता. कंपनीने नुकताच आपला सर्वात स्वस्त ब्रॉडबँड प्लान बंद केला आहे.
युजर्सना 329 रुपयांमध्ये 20Mbps प्लॅन मिळत होता. ब्रॉडबँड क्षेत्रातही कंपनी मागे पडली आहे. म्हणूनच कंपनी नवीन प्लॅन आणत आहे.