BSNL चा धमाका, 'या' स्वस्त प्लॅनमध्ये मिळेल 1000GB डेटा, रॉकेट स्पीडने इंटरनेट चालणार...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2024 10:04 PM2024-07-09T22:04:45+5:302024-07-09T22:06:28+5:30
खासगी टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देण्यासाठी BSNL ने स्वस्त प्लॅन्स आणले आहेत.
BSNL Plans : काही दिवसांपूर्वीच देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या, जिओ, एअरटेल आणि व्हीने आपल्या प्लॅन्सच्या किमती वाढवल्या आहेत. त्यामुळे अनेक युजर BSNL वापरण्यावर भर देत आहेत. दरम्यान, BSNL ने या खासगी टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देण्याची पूर्ण तयारी केली आहे. BSNL आपल्या ग्राहकांना अतिशय कमी दरात अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि हाय स्पीड इंटरनेट देत आहे. आज आम्ही तुम्हाला कंपनीच्या ब्रॉडबँड प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्यात तुम्हाला तब्बल 1000GB सुपरफास्ट इंटरनेट मिळणार आहे.
1000GB डेटा मिळेल
कंपनीच्या Bharat Fibre मध्ये अनेक प्लॅन्स आहेत, ज्यात ग्राहकांना सुपरफास्ट इंटरनेट दिले जाते. दरम्यान, BSNL च्या 329 रुपयांच्या फायबर ब्रॉडबँड प्लॅनमध्ये ग्राहकांना 25Mbps च्या वेगाने 1000GB डेटा ऑफर केला जात आहे. याशिवाय कंपनीच्या 399 रुपयांच्या भारत फायबर ब्रॉडबँड प्लॅनमध्ये 30Mbps च्या स्पीडने 1400GB डेटा दिला जात आहे. हे दोन्ही ब्रॉडबँड प्लॅन खासकरून ग्रामीण भागातील युजर्ससाठी आहेत. या प्लॅन्सची वैधता संपूर्ण महिन्यासाठी आहे.
दरम्यान, कंपनीच्या बेसिक ब्रॉडबँड ग्राहकांसाठीही दोन प्लॅन्स आहेत. 249 रुपयांच्या ब्रॉडबँड प्लॅनमध्ये युजरला 25Mbps च्या वेगाने 10GB डेटा मिळतो. डेटा संपल्यानंतर 2Mbps च्या स्पीडने अमर्यादित इंटरनेट वापरता येते. तर, 299 रुपयांच्या प्लॅनमध्ये 25Mbps च्या स्पीडवर 20GB डेटा दिला जातो. यानंतर यूजर्सना 2Mbps च्या स्पीडने अमर्यादित डेटा मिळतो. विशेष म्हणजे, या प्लॅन्समध्ये युजरला देशभरातील कोणत्याही नंबरवर अमर्यादित लोकल आणि एसटीडी कॉलिंगचा लाभ मिळेल.