कमी किमतीत 5 महिन्यांची व्हॅलिडिटी; BSNL चा नवा रिचार्ज प्लॅन पाहिला का..?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 09:06 PM2024-08-19T21:06:20+5:302024-08-19T21:08:33+5:30
जिओ, एअरटेलपेक्षा कमी किमतीत मिळतील अधिक लाभ.
BSNL Reacharge : खासगी टेलिकॉम कंपन्या Jio, Airtel आणि Vodafone-Idea(Vi) त्यांच्या रिजार्जच्या किमती वाढवल्यामुळे लाखो ग्राहक BSNL मध्यो सिम पोर्ट करत आहेत. BSNL नेदेखील या संधीचा फायदा उचलण्यासाठी अनेक स्वस्त रिचार्ज प्लॅन्स लॉन्च केले आहेत. आम्ही तुम्हाला अशाच एका स्वस्त रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्यात तुम्हाला कमी किमतीत पाच महिन्यांची व्हॅलिडिटी मिळते.
BSNL चा नवीन रिचार्ज प्लॅन
BSNL चा हा नवीन रिचार्ज प्लॅन 997 रुपयांचा आहे. 997 रुपयांमध्ये तुम्हाला 160 दिवसांची, म्हणजेच 5 महिन्यांची वैधता मिळते. या प्लॅनमध्ये युजरला दररोज 2GB डेटा, म्हणजेच एकूण 320GB डेटा मिळतो. याशिवाय, या प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर मोफत अमर्यादित व्हॉईस कॉलिंग करता येईल. या प्लॅनसोबत हार्डी गेम्स, झिंग म्युझिक आणि बीएसएनएल ट्यून्स सारख्या सेवादेखील दिल्या जातात.
5G सेवा कधी सुरू होणार?
BSNL 15 ऑक्टोबर रोजी अधिकृतपणे 4G सेवा लॉन्च करण्याची घोषणा करू शकते. तसेच, मार्च 2025 पर्यंत देशभरात 4G सेवा सुरू होण्याची अपेक्षा आहे. तर BSNL ची 5G सेवा 2025 च्या अखेरपर्यंत सुरू केली जाऊ शकते. बीएनएसएलकडून स्वस्त डेटा आणि कॉलिंगच्या मदतीने ग्रामीण भारतातील डिजिटल दरी भरून काढता येईल, असे मानले जात आहे. पंतप्रधान मोदींच्या आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेले हे एक पाऊल असेल.