BSNL चा दमदार प्लॅन; दररोज 3 रुपयांपेक्षा कमी खर्चात मिळतात अनेक फायदे...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 16:13 IST2025-02-27T16:13:30+5:302025-02-27T16:13:41+5:30
BSNL Recharge Plan: या प्लॅनमध्ये डेटा अन् कॉलिंगसह दीर्घ वैधताही मिळते.

BSNL चा दमदार प्लॅन; दररोज 3 रुपयांपेक्षा कमी खर्चात मिळतात अनेक फायदे...
BSNL Recharge Plan: सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL आपल्या स्वस्त रिचार्ज प्लॅनसाठी प्रसिद्ध आहे. यामुळेच खासगी टेलिकॉम कंपन्यांच्या महागड्या रिचार्ज प्लॅनमुळे हैराण झालेले ग्राहक बीएसएनएलकडे वळत आहेत. आज आम्ही कंपनीच्या एका अशा प्लॅनची माहिती घेऊन आलो आहे, जो 3 रुपयांपेक्षा कमी किमतीत 70 दिवसांची दीर्घ वैधतेसह इतर अनेक फायदे देतो.
BSNL चा 197 रुपयांचा प्लान
BSNL च्या 197 रुपयांच्या प्लॅनमध्ये 70 दिवसांची वैधता मिळते. म्हणजेच या प्लॅनमध्ये यूजर्सना दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीच्या वैधतेचा लाभ मिळत आहे. यासोबतच कंपनी कॉलिंग, डेटा आणि एसएमएसचे फायदेही देत आहे. हा प्लॅन घेतल्यानंतर पहिल्या 18 दिवसांसाठी दररोज 100 एसएमएस आणि देशातील कोणत्याही नंबरवर अमर्यादित कॉलिंगचा लाभ दिला जातो. डेटाबद्दल बोलायचे झाले तर, कंपनी पहिल्या 18 दिवसांसाठी दररोज 2GB डेटा देत आहे.
हा प्लॅन खास या लोकांसाठी
ही योजना त्यांच्यासाठी उपयुक्त आहे, जे BSNL कनेक्शन दुय्यम सिम म्हणून वापरतात किंवा ज्यांना त्यांचा नंबर चालू ठेवण्यासाठी दीर्घ वैधता आवश्यक आहे. 3 रुपयांपेक्षा कमी दैनंदिन खर्चात, हा प्लॅन 70 दिवसांची वैधता ऑफर करत आहे.
कंपनी लवकरच 4G सेवा सुरू करणार
बीएसएनएलने लवकरच 4G सेवा सुरू करण्याची योजना आखली आहे. यासाठी कंपनीने देशभरात एक लाख टॉवर्स बसवण्याचे उद्दिष्ट ठेवले असून त्यापैकी 80 हजार टॉवर्स बसवण्यात आले आहेत. केरळमध्ये हे काम वेगाने सुरू आहे. हे काम 31 मार्चपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. नवीन टॉवर्स बसवल्यामुळे बीएसएनएलची कॉल कनेक्टिव्हिटीही सुधारणार आहे.