BSNL चा शानदार रिचार्ज प्लॅन, एका वर्षासाठी दररोज ३ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 17:27 IST2025-02-08T17:27:28+5:302025-02-08T17:27:39+5:30
BSNL : तुम्ही वर्षभरासाठी बीएसएनएलचा २,९९९ रुपयांचा प्लॅन रिचार्ज करू शकता. या प्लॅनची व्हॅलिडिटी एकूण ३६५ दिवसांची आहे.

BSNL चा शानदार रिचार्ज प्लॅन, एका वर्षासाठी दररोज ३ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग...
नवी दिल्ली : बीएसएनएल (BSNL) ही देशातील एक प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी आहे. बीएसएनएल ही आपल्या युजर्ससाठी विविध किंमतींच्या श्रेणीत अनेक रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. या प्लॅनमध्ये युजर्सना डेटा आणि कॉलिंगची सुविधा मिळते. जर तुम्ही बीएसएनएल युजर्स असाल आणि वर्षभराचा प्लॅन शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
तुम्ही वर्षभरासाठी बीएसएनएलचा २,९९९ रुपयांचा प्लॅन रिचार्ज करू शकता. या प्लॅनची व्हॅलिडिटी एकूण ३६५ दिवसांची आहे.तर बीएसएनएलच्या पोर्टफोलिओमध्ये विविध किंमतीच्या श्रेणींमध्ये अनेक रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहेत. युजर्स आपल्या आवडीनुसार कोणताही प्लॅन रिचार्ज करू शकतो. यापैकी एक प्लॅन २,९९९ रुपयांना मिळतो.
या प्लॅनमुळे युजर्सना वर्षभर रिचार्ज करण्याचा त्रास कमी होतो. याचा अर्थ असा की, हा प्लॅन ३६५ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. या प्लॅनमध्ये युजर्सना संपूर्ण व्हॅलिडिटी कालावधीत अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. म्हणजेच युजर्स देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर त्यांना हवे तितके कॉल करू शकतील.
याचबरोबर, या प्लॅनमध्ये युजर्सना अनलिमिटेड डेटा मिळतो. मात्र, दररोज ३ जीबी डेटा वापरल्यानंतर स्पीड ४० केबीपीएस पर्यंत कमी होईल. तसेच, या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज १०० टेक्स्ट मेसेज पाठवण्याची सुविधा मिळते.
सरकारी दूरसंचार कंपनी
दरम्यान, बीएसएनएल ही देशातील एक सरकारी दूरसंचार कंपनी आहे. ही स्वस्त रिचार्ज प्लॅनसाठी ओळखली जाते. काही महिन्यांपूर्वी देशातील खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्या होत्या. पण, बीएसएनएलने आपल्या प्लॅनच्या किंमती वाढवल्या नाहीत. आजही बीएसएनएल आपल्या युजर्सना जुन्या किमतीत रिचार्ज प्लॅन देत आहे.