BSNL SIM: घरबसल्या ऑर्डर करा BSNL चे 4G सिम कार्ड; जाणून घ्या प्रोसेस...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 04:30 PM2024-08-06T16:30:54+5:302024-08-06T16:37:17+5:30

BSNL SIM : हायस्पीड कनेक्टिव्हिटीसाठी ऑक्टोबर 2024 पर्यंत BSNL देशभरात सुमारे 80 हजार टॉवर बसवणार आहे.

BSNL SIM: Order BSNL SIM card from home; Know the process… | BSNL SIM: घरबसल्या ऑर्डर करा BSNL चे 4G सिम कार्ड; जाणून घ्या प्रोसेस...

BSNL SIM: घरबसल्या ऑर्डर करा BSNL चे 4G सिम कार्ड; जाणून घ्या प्रोसेस...

BSNL SIM : खासगी टेलिकॉम कंपन्यांनी(Jio, Airtel, Vi) आपल्या रिचार्जच्या किमती वाढवल्यामुळे सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ला 'अच्छे दिन' आले आहेत. अनेकजण आपले सिम BSNL मध्ये पोर्ट करत आहेत. दरम्यान, आणखी ग्राहकांना आपल्याकडे वळवण्यासाठी BSNL ने देशात आपली 4G सेवा सुरू केली असून, लवकरच 5G सेवाही सुरू होणार आहे. तुम्हालाही BSNL चे सिम हवे असल्यास, तुम्ही ते घरबसल्या मागवू शकता. 

लवकरच 80 हजार टॉवर बांधणर
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले की, ऑक्टोबर 2024 पर्यंत BSNL देशभरात सुमारे 80 हजार टॉवर बसवणार आहे. उर्वरित 21 हजार टॉवर मार्च 2025 पर्यंत बसवले जातील. याचा अर्थ मार्च 2025 पर्यंत देशभरात सुमारे 1 लाख बीएसएनएल टॉवर बसवले जातील. याशिवाय 5G सेवेवरही काम सुरू आहे. 5G सेवा फक्त 4G टॉवरवरच मिळू शकते, त्यासाठी काही बदल करावे लागतील, त्यावर काम सुरू असल्याचेही सिंधियांनी सांगितले.

घरबसल्या BSNL सिम ऑर्डर करा
देशातील सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल देशात वेगाने आपले नेटवर्क विस्तारत आहे. Airtel, Jio आणि Vi च्या महागड्या रिचार्जनंतर BSNL सिम घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पण तुम्हाला हवे असल्यास तुम्ही घरबसल्या बीएसएनएल सिमकार्ड मागवू शकता. यासाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

BSNL सिम कार्ड घरबसल्या ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. इतर दूरसंचार कंपन्यांप्रमाणे बीएसएनएलनेही प्रून नावाच्या कंपनीसोबत भागीदारी करून सिम कार्ड वितरणाचे काम सुरू केले आहे. या वेबसाइटला भेट देऊन तुम्ही सिम कार्ड ऑर्डर करू शकता. हे ॲप तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ते 90 मिनिटांत सिम तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करतील. 

सर्वप्रथम तुम्हाला prune.co.in या वेबसाइटवर जावे लागेल. यानंतर तुम्हाला येथे Buy SIM Card या पर्यायावर क्लिक करावे लागेल. भारत देश निवडून ऑपरेटरसाठी बीएसएनएल निवडावे लागेल. यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल, ज्यावर एक OTP येईल. OTP भरण्यासोबतच तुम्हाला येथे विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल.

यानंतर तुम्हाला तुमचा पत्ता भरावा लागेल. नवीन BSNL सिम कार्ड तुम्हाला पुढील 90 मिनिटांत वितरित केले जाईल. यानंतर तुमचे केवायसी घरबसल्या केले जाईल आणि सिमही अॅक्टिव्ह होईल. सध्या कंपनी फक्त हरियाणातील गुरुग्राम आणि उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यात ही सुविधा देत आहे. काही काळानंतर या सेवा इतर शहरांमध्येही सुरू करता येतील.

Web Title: BSNL SIM: Order BSNL SIM card from home; Know the process…

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.