BSNL's Cashback Offer : बीएसएनएलची भन्नाट ऑफर; एक एसएमएस केला तरीही मिळणार कॅशबॅक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 11:29 AM2019-11-21T11:29:29+5:302019-11-21T11:29:53+5:30
BSNL's Cashback Offer : रिलायन्स जिओने अन्य कंपन्यांच्या नेटवर्कवर कॉल केल्यास 6 पैसे आकारणार असल्याची घोषणा करत रिचार्जची रक्कमही वाढविली होती.
नवी दिल्ली : एकीकडे प्राईस वॉर सोडून खासगी कंपन्या दरवाढीची स्पर्धा करू लागलेल्या असताना बीएसएनएलने कोणतीही दरवाढ करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. याचबरोबर आता एसएमएस केल्यावरही कॅशबॅक देण्याची भन्नाट ऑफरच सुरू केली आहे.
कॉलिंग केल्यावर मिनिटाला 6 पैशांचा कॅशबॅक देण्याची योजना बीएसएनएलने गेल्या महिन्यात लाँच केली होती. आता ही योजना वाढविली असून यापुढे एसएमएस केल्यावरही सहा पैशांचा कॅशबॅक मिळणार आहे. यानुसार ग्राहकांनी एसएमएस पाठविल्याल त्याला 6 पैशांचा कॅशबॅक मिळणार आहे. यासाठी ACT 6 paisa असा मॅसेज टाईप करून 9478053334 या नंबरवर पाठवावा लागणार आहे.
ही ऑफर ऑफर BSNL वायरलाइन, ब्रॉडबँड आणि फायबर टू द होमच्या ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे. ही ऑफर 31 डिसेंबरपर्यंत असणार आहे. रिलायन्स जिओने अन्य कंपन्यांच्या नेटवर्कवर कॉल केल्यास 6 पैसे आकारणार असल्याची घोषणा करत रिचार्जची रक्कमही वाढविली होती. यामुळे बीएसएनएलने या उलट ऑफर देत कॉल केल्यास ६ पैशांचा कॅशबॅक ग्राहकांना देऊ केला होता.
ग्रामीण भागांत होणार फायदा
जिओच्या योजनेमुळे नाराज झालेले ग्राहक आपल्याकडे आणण्यासाठी बीएसएनएलने ही योजना आणल्याचे बोलले जात आहे. सध्या देशाच्या ग्रामीण भागांत बीएसएनएल कंपनीचेच अधिक ग्राहक आहेत. त्यांना या घोषणेचा निश्चितच फायदा होईल.
३० सेकंद वाजणार रिंग
मोबाइल सेवा देणाºया कंपन्यांमध्ये वाद सुरु असतानाच ट्रायने १ नोव्हेंबरपासून कॉल रिंग किती काळ वाजेल हे निश्चित केले. मोबाइलवरून मोबाइलवर कॉलची रिंग ३० सेकंद वाजेल. मोबाइवरून लँडलाइनवर कॉलची रिंग ६० सेकंद वाजणार आहे.