BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 09:10 PM2024-10-02T21:10:41+5:302024-10-02T21:11:49+5:30
BSNL ने आता स्मार्टफोन क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
BSNL SmartPhone : खासगी टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या किमती वाढवल्यानंतर BSNL ने स्वस्त प्लॅन्स लॉन्च करतुन लाखो ग्राहकांना आपल्याकडे ओढून घेतले. कंपनी सध्या देशभरात 4G नेटवर्क देण्यासाठी आपल्या टॉवर्सची संख्या वाढवण्यार भर देत आहे. दरम्यान, आता कंपनीने एक असे पाऊलउ उचलले आहे, ज्यामुळे एअरटेल आणि जिओची झोप उडाली आहे. सिम कार्डसोबतच BSNL ने स्मार्टफोन क्षेत्रात उतरण्याची तयारी केली आहे. कंपनी लवकरच स्वस्त स्मार्टफोन आणणार आहे. यासाठी कंपनीने एका कंपनीसोबत करारदेखील केला आहे.
बीएसएनएलची मोठी योजना
BSNL इंडियाने त्यांच्या अधिकृत X हँडलवरून स्थापना दिवसाशी संबंधित एक पोस्ट शेअर केली आहे. सरकारी कंपनीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, BSNL ने कार्बनसोबत एक सामंजस्य करार केला आहे. यानुसार, ग्राहकांना भारत 4G कंपेनियन पॉलिसी अंतर्गत खास स्मार्टफोन ऑफर केले जातील. कंपनीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ते 4G स्मार्टफोन वापरकर्त्यांना स्वस्त दरात स्मार्टफोन देणारआहेत.
With the signing of a landmark #MoU, #BSNL and #KarbonnMobiles to introduce an exclusive SIM handset bundling offer under the Bharat 4G companion policy. Together, we aim to bring affordable 4G connectivity to every corner of the nation.#BSNLDay#BSNLFoundationDaypic.twitter.com/M37lXjhaGP
— BSNL India (@BSNLCorporate) October 1, 2024
कार्बन काही वर्षांपूर्वीपर्यंत भारतात अँड्रॉइड स्मार्टफोनची विक्री करत असे. गेल्या दशकात फीचर फोन आणि स्मार्टफोन मार्केटमध्ये कंपनीची चांगली पकड होती. भारतीय बाजारपेठेत चीनी ब्रँड्सच्या प्रवेशानंतर कार्बनचा युजर बेस कमी होत गेला. मात्र, कंपनीने पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कार्बन मोबाईल्सने भारत संचार निगम लिमिटेडसोबत भागीदारी केली आहे.
JioPhone प्रमाणे, BSNL आपल्या वापरकर्त्यांना कार्बनचा स्वस्त 4G फीचर फोन ऑफर करेल. सध्या सरकारी दूरसंचार कंपनी देशभरातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी त्यांचे नेटवर्क अपग्रेड करत आहे. एवढेच नाही तर बीएसएनएलने 5Gची चाचणीही सुरू केली आहे. पुढील वर्षी देशभरात 4G-5G नेटवर मिळण्याची अपेक्षा आहे.