BSNL ची आपल्या कोट्यवधी ग्राहकांना मोठी भेट; कंपनीने सुरू केली HD कॉलिंग सेवा...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 03:38 PM2024-11-28T15:38:48+5:302024-11-28T15:39:21+5:30
BSNL 5G नेटवर्कची चाचणी सुरू असून, लवकरच देशभरात ही सेवा सुरू केली जाईल.
BSNL आपल्या ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी सातत्याने आपल्या नेटवर्कचा विस्तार करत आहे. कंपनीने आतापर्यंत देशभरात 50 हजारांहून अधिक नवीन 4G मोबाइल टॉवर्स बसवले असून, त्यापैकी 41 हजारांहून अधिक मोबाइल टॉवर सुरू झाले आहेत. हे 4G टॉवर्स बसवल्यामुळे कनेक्टिव्हिटी पूर्वीपेक्षा अधिक चांगली झाली आहे. दरम्यान, आता, कंपनीने आपल्या 9 कोटींहून अधिक ग्राहकांसाठी HD कॉलिंग सेवाही सुरू केली आहे. युजर आता BSNL च्या नेटवर्कवर HD (हाय डेफिनेशन) कॉल करता येईल. BSNL 4G युजर्स त्यांच्या नंबरवर ही VoLTE सेवा अॅक्टिव्ह करू शकतील.
बीएसएनएल नंबरवर एचडी कॉलिंग सुरू करण्यासाठी ग्राहकांना त्यांचे सिम अपडेट करावे लागेल. म्हणजे, त्यांचे सिम हे 4G/5G असायला हवे, तर त्यावर एचडी कॉलिंग करता येईल. BSNL च्या 2G/3G सिमकार्डवर एचडी कॉलिंग करता येणार नाही. ज्यांच्याकडे 2G/3G कार्ड्स आहेत, त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. कंपनी ग्राहकांना मोफत 4G सिम कार्ड देत आहे. यासाठी ग्राहकाला त्यांच्या जवळच्या टेलिफोन एक्सचेंज किंवा कस्टमर केअर सेंटरला भेट द्यावी लागेल. आवश्यक कागदपत्रे पडताळणीनंतर ग्राहकाला नवीन 4G/5G सिम कार्ड मोफत मिळेल.
Switch to the speed of the future with BSNL!
— BSNL India (@BSNLCorporate) November 27, 2024
Upgrade your 2G/3G SIM to 4G today and get your 4G SIM absolutely FREE.
📍Visit your nearest BSNL Customer Service Center now!
Don’t miss out on blazing-fast connectivity. #BSNL4G#UpgradeNow#StayConnectedpic.twitter.com/ChLB0LC9YO
HD कॉलिंग कशी सुरू करायची?
तुम्हाला तुमच्या BSNl नंबरवर VoLTE/HD कॉलिंग सुरू करण्यासाठी फोनच्या मेसेज अॅपमध्ये ACTVOLTE टाईप करुन 53733 वर मेसेज पाठवावा लागेल. संदेश पाठवल्यानंतर काही मिनिटांत तुमच्या नंबरवर VoLTE सेवा सुरू केली जाईल. सेवा सुरू झाल्यानंतर तुम्ही कुठल्याही नंबरवर एचडी कॉलिंग करू शकता. एचडी कॉलिंगसाठी अट एकच आहे, ती म्हणजे तुम्ही 4G नेटवर्क असलेल्या भागात असायला हवेत.
लवकरच 5G सुरू होणार
BSNL पुढील वर्षी जूनपर्यंत देशभरात 4G सेवा सुरू करणार आहे. याशिवाय कंपनी 5G चीही चाचणी करत आहे. अशा स्थितीत पुढील वर्षाच्या अखेरीस बीएसएनएलची 5G सेवा सुरू होऊ शकते.