BSNL च्या 'या' स्वस्त प्लॅनसमोर सगळेच 'फेल', ५ महिन्यांपर्यंत रिचार्जचे टेन्शन नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 01:45 PM2024-08-26T13:45:20+5:302024-08-26T13:49:31+5:30
BSNL ने देशातील सर्व प्रमुख शहरे आणि टेलिकॉम सर्किलमध्ये ४ जी ची टेस्टिंग जवळपास पूर्ण केली आहे.
नवी दिल्ली : बीएसएनएल (BSNL) लवकरच भारतात आपली ४ जी सेवा सुरू करणार आहे. सरकारी टेलिकॉम कंपनीने खासगी ऑपरेटर्सना आव्हान देण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारने बीएसएनएलला पुनरुज्जीवित करण्यासाठी ८३ हजार कोटी रुपयांच्या निधीचीही घोषणा केली आहे.
BSNL ने देशातील सर्व प्रमुख शहरे आणि टेलिकॉम सर्किलमध्ये ४ जी ची टेस्टिंग जवळपास पूर्ण केली आहे. याशिवाय, कंपनीने २५ हजारांहून अधिक नवीन ४ जी टॉवर्स देखील इंस्टॉल केले आहेत. दरम्यान, गेल्या महिन्यात खाजगी टेलिकॉम कंपन्यांच्या मोबाईलच्या दरात वाढ केल्यानंतर लाखो युजर्सनी आपले नंबर BSNL कडे पोर्ट केले आहेत.
बीएसएनएल सध्या युजर्सना असे अनेक स्वस्त प्लॅन ऑफर करत आहे, जे Jio, Airtel किंवा Vi कडे नाहीत. दरम्यान, BSNL कडे असाच एक प्लॅन आहे, ज्यामध्ये युजर्सना ५ महिने म्हणजेच १५० दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. या प्लॅनसाठी युजर्सना ४०० रुपयांपेक्षा कमी खर्च करावा लागेल. BSNL चा हा रिचार्ज प्लॅन ३९७ रुपयांचा आहे.
विशेषत: हा प्लॅन अशा युजर्ससाठी आहे, जे BSNL सिमला सेकेंडरी नंबर म्हणून वापरतात. BSNL च्या या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना १५० दिवसांसाठी मोफत इनकमिंग कॉलची ऑफर मिळते. तसेच, या प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या बेनिफिट्सबद्दल सांगायचे तर, हा प्लॅनमध्ये पहिल्या ३० दिवसांसाठी देशभरातील कोणत्याही नंबरवर अनलिमिटेड मोफत कॉलिंगचा लाभ मिळेल.
याशिवाय संपूर्ण देशात फ्री रोमिंगचा लाभही मिळणार आहे. मात्र, ३० दिवसांनंतर युजर्सना आउटगोइंग कॉलसाठी टॉप-अप रिचार्ज करावे लागेल. याचबरोबर, इनकमिंग कॉल १५० दिवस सुरू राहतील. या प्लॅनमध्ये युजर्सला पहिले ३० दिवस दररोज २ जीबी डेटाचा फायदा मिळेल. यानंतर 40kbps च्या स्पीडने अनलिमिटेड डेटा मिळेल. एवढेच नाही तर तुम्हाला पहिल्या ३० दिवसांसाठी दररोज १०० मोफत एसएमएसही मिळतील.