BSNL चा सर्वात स्वस्त प्लॅन; 365 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह मिळेल तब्बल 600GB इंटरनेट डेटा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2024 07:53 PM2024-09-01T19:53:25+5:302024-09-01T19:53:32+5:30

तुम्ही इंटरनेटचा जास्त वापर करत असाल, तर हा प्लॅन तुमच्यासाठीच आहे.

BSNL's cheapest plan; Get up to 600GB internet data with a validity of 365 days | BSNL चा सर्वात स्वस्त प्लॅन; 365 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह मिळेल तब्बल 600GB इंटरनेट डेटा

BSNL चा सर्वात स्वस्त प्लॅन; 365 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह मिळेल तब्बल 600GB इंटरनेट डेटा

Jio, Airtel आणि Vi ने रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्यापासून BSNL ला 'अच्छे दिन' आले आहेत. लाखो ग्राहक BSNL मध्ये सिम पोर्ट करत आहेत. दरम्यान, हा ग्राहकवर्ग टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी BSNL देखील नवनवीन प्लॅन्स आणत आहे. आम्ही तुम्हाला BSNL च्या एका स्वस्त वार्षिक प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्यात तुम्हाला भरमसाठ डेटा मिळतोय.

Jio, Airtel आणि Vi चे ग्राहक आपल्याकडे ओढण्यासाठी BSNL ने आपल्या पोर्टफोलिओमध्ये अनेक दीर्घ वैधतेचे स्वस्त प्लॅन्स आणले आहेत. तुम्ही BSNL युजर असाल आणि दीर्घ वैधता असलेला स्वस्त प्लॅन शोधत असाल, तर आज आम्ही तुम्हाला BSNL च्या अशाच एका प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्यात एक वर्षाची वैधता मिळते. याशिवाय, या प्लॅनमध्ये इतर कोणत्याही कंपनीपेक्षा जास्त डेटा मिळतोय.

BSNL कडे 2999 रुपयांचा प्लान आहे. BSNL या प्लॅनमध्ये ग्राहकांना पूर्ण 365 दिवसांची वैधता मिळते. याचा अर्थ, एकदा रिचार्ज केल्यावर तुम्हाला वर्षभर रिचार्जच्या त्रासापासून मुक्तता मिळेल. या प्लॅनमध्ये तुम्ही 365 दिवसांसाठी कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग करू शकता. जर तुम्ही इंटरनेटचा जास्त वापर करत असाल तर सरकारी टेलिकॉम कंपनीचा हा प्लान तुमच्यासाठीच आहे. 

या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 600GB डेटा मिळतो. या डेटा पॅकसह तुम्ही कोणत्याही तणावाशिवाय ओटीटी स्ट्रीमिंग आणि ब्राउझिंग करू शकता. विशेष म्हणजे, 600GB डेटा संपल्यानंत 40Kbps च्या वेगाने डेटा वापरता येतो. BSNL ग्राहकांना या रिचार्ज प्लॅनसह एका महिन्यासाठी मोफत BSNL Tunes सबस्क्रिप्शन देते. या प्लॅनमध्ये तुम्हाला EROS NOW Entertainment चे 30 दिवसांसाठी मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळते. याशिवाय, दररोज मोफत 100 एसएमएस देखील मिळतात.    

Web Title: BSNL's cheapest plan; Get up to 600GB internet data with a validity of 365 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.