BSNL चा सर्वात दमदार प्लॅन; 850GB डेटा अन् 425 दिवसांची व्हॅलिडिटीसह अनेक फायदे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 21:21 IST2025-01-13T21:20:20+5:302025-01-13T21:21:21+5:30

हा BSNL सर्वात जास्त वैधता असलेला प्लॅन आहे.

BSNL's most powerful plan; 850GB data and many benefits including 425 days validity... | BSNL चा सर्वात दमदार प्लॅन; 850GB डेटा अन् 425 दिवसांची व्हॅलिडिटीसह अनेक फायदे...

BSNL चा सर्वात दमदार प्लॅन; 850GB डेटा अन् 425 दिवसांची व्हॅलिडिटीसह अनेक फायदे...

सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने आपल्या करोडो युजर्सचे वारंवार रिचार्ज करण्याचे टेन्शन दूर केले आहे. कंपनीकडे एक असा रिचार्ज प्लॅन आहे, ज्यामध्ये सर्वात जास्त वैधता मिळते. तसेच, प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि इंटरनेट डेटासह अनेक फायदेही मिळतात. यापूर्वी कंपनीने 395 दिवसांची वैधता असलेला प्लॅन आणला होता, पण आता यापेक्षाही जास्त वैधतेचा प्लॅन आणला आहे. विशेष म्हणजे, हा प्लॅन इतर टेलिकॉम कंपन्यांच्या प्लॅनपेक्षा खूप स्वस्त आहे. 

425 दिवसांचा प्लॅन
BSNL ने आणलेल्या नवीन प्लॅनमध्ये तुम्हाला 425 दिवसांची वैधता मिळते. या प्लॅनसाठी तुम्हाला फक्त 2,399 रुपये खर्च करावे लागतील. म्हणजेच, दररोज फक्त 5.6 रुपये खर्च येईल. या प्लॅनमधील इतर फायदे सांगायचे, तर यात भारतात कुठल्याही नेटवर्कवर अनलिमेटेड कॉलिंगचा लाभ मिळतो. याशिवाय, युजरला संपूर्ण भारतात मोफत नॅशनल रोमिंगचा लाभदेखील दिला जातो. 

BSNL च्या या प्लॅनमध्ये युजरला दररोज 2GB हायस्पीड डेटाचा लाभ मिळेल. अशा प्रकारे एकूण 850GB डेटा मिळेल. कंपनी या प्लॅनमध्ये यूजर्सना दररोज 100 फ्री एसएमएसचा लाभही देत ​​आहे. याशिवाय सरकारी टेलिकॉम कंपनीने 215 आणि 628 रुपयांचे दोन नवीन रिचार्ज प्लॅन आणले आहेत. हे दोन्ही प्लॅन अनुक्रमे 30 दिवस आणि 84 दिवसांची वैधता देत आहेत.

दोन नवीन प्लॅन
215 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजरला दररोज 2GB हायस्पीड डेटाचा लाभ मिळेल. हा प्लॅन मोफत नॅशनल रोमिंग आणि दररोज 100 मोफत एसएमएससह येतो. तर 628 रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्सना 84 दिवसांची वैधता मिळते. हा प्लान दररोज 3GB हाय स्पीड डेटासह येतो. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि फ्री नॅशनल रोमिंगचाही लाभ मिळेल.

Web Title: BSNL's most powerful plan; 850GB data and many benefits including 425 days validity...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.