BSNL चा दमदार प्लॅन; दर महिन्याला मिळेल 5000GB डेटा अन् हाय स्पीड इंटरनेट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 02:53 PM2024-09-24T14:53:22+5:302024-09-24T14:54:09+5:30

BSNL च्या या प्लॅनमध्ये ग्राहकाला 200Mbps ची स्पीड मिळेल.

BSNL's powerful plan; Get 5000GB data and high speed internet every month | BSNL चा दमदार प्लॅन; दर महिन्याला मिळेल 5000GB डेटा अन् हाय स्पीड इंटरनेट

BSNL चा दमदार प्लॅन; दर महिन्याला मिळेल 5000GB डेटा अन् हाय स्पीड इंटरनेट

BSNL : खासगी टेलिकॉम कंपन्या Airtel, Jio आणि vi ने आपल्या रिचार्ज प्लॅन्सच्या किमती वाढवल्यामुळे ग्राहक प्रचंड नाराज आहेत. या संधीचा फायदा सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने उचलला आहे. BSNL गेल्या काही काळापासून स्वस्त प्लॅन्स लॉन्च करत आहे. शिवाय, आपल्या नेटवर्कचा वेगाने विस्तारही करत आहेत. येत्या काही दिवसांत BSNL ची 5G सेवा सुरू होणार आहे.

या प्लॅनमध्ये मिळणार 5000GB डेटा
स्वस्त प्लॅन्स लॉन्च करुन BSNL ने खासगी टेलिकॉम कंपन्यांसाठी दगडे आव्हान निर्माण केले आहे. कंपनी मोबाईल युजर्ससोबतच ब्रॉडबँड इंटरनेट वापरकर्त्यांसाठीही अनेक स्वस्त प्लॅन्स आणत आहेत. कंपनीने  आणखी एक प्लॅन आणला आहे, ज्यामध्ये ग्राहकाला तब्बल 5000 GB इंटरनेट डेटा मिळणार आहे. या प्लॅनमध्ये युजरला 200Mbps च्या हाय स्पीडने इंटरनेट वापरता येईल.

किती रुपयांना?
BSNL चा हा प्लान 999 रुपये प्रति महिना किमतीत उपलब्ध आहे, ज्यामध्ये यूजरला संपूर्ण महिन्यासाठी 5000 GB इंटरनेट डेटा मिळेल. डेटा संपल्यानंतर युजर 10Mbps च्या वेगाने अमर्यादित इंटरनेट वापरू शकतो. या प्लॅनची ​​खास गोष्ट म्हणजे BSNL इंस्टॉलेशन चार्जेस आकारत नाही, त्यामुळे तुम्ही कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय घरबसल्या ब्रॉडबँड सेवेचा आनंद घेऊ शकता. 

अनेक OTT ॲप्स मिळणार
BSNL या ब्रॉडबँड प्लॅनसह युजरला अनेक OTT ॲप्सचे विनामूल्य सबस्क्रीप्शनदेखील देत आहे. यात Disney Plus Hotstar, Sony LIV, Zee5, YuppTV आणि हंगामा सारख्या प्लॅटफॉर्मचा समावेश आहे. यासोबतच या योजनेत देशभरातील कोणत्याही नंबरवर अमर्यादित कॉलिंगची सुविधाही दिली जात आहे.

Web Title: BSNL's powerful plan; Get 5000GB data and high speed internet every month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.