पुढील आठवड्यात येतोय सर्वात पातळ Laptop; किंमत असू शकते विद्यार्थ्यांना परवडणारी  

By सिद्धेश जाधव | Published: June 8, 2022 11:49 AM2022-06-08T11:49:09+5:302022-06-08T11:49:30+5:30

Infinix भारतात आपला नवीन InBook X1 Slim लॅपटॉप लाँच करणार आहे, जो कंपनीचा सर्वात पातळ स्मार्टफोन असेल.  

Budget Laptop Infinix Inbook X1 Slim Launching In India On 15th June  | पुढील आठवड्यात येतोय सर्वात पातळ Laptop; किंमत असू शकते विद्यार्थ्यांना परवडणारी  

पुढील आठवड्यात येतोय सर्वात पातळ Laptop; किंमत असू शकते विद्यार्थ्यांना परवडणारी  

Next

Infinix InBook X1-Series ची सुरुवात कंपनीनं गेल्यावर्षी केली होती. या सीरिजमध्ये किफायतशीर लॅपटॉप्स सादर करण्यात आले होते. आता यात InBook X1 Slim ची भर टाकली जाऊ शकते. जो कंपनीचा आकाराने सर्वात पातळ लॅपटॉप असू शकतो. हा लॅपटॉप पुढील आठवड्यात भारतीय ग्राहकांच्या सेवेत दाखल होईल, असं इनफिनिक्स इंडियानं सांगितलं आहे.  

कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, Infinix InBook X1 Slim सेगमेंट लिडिंग फीचर्ससह भारतात 15 जूनपर्यंत लाँच होईल. Infinix InBook X1 Slim 14.88mm जाड असेल आणि याचे वजन 1.24kg असेल. त्यामुळे हा प्राईस सेगमेंटमधील हलका आणि पातळ लॅपटॉप ठरू शकतो. लॅपटॉप ऑल-मेटल बॉडीसह रेड, ग्रीन, ब्लू आणि ग्रे कलरमध्ये सादर होईल. ज्यात मोठी बॅटरी आणि टाइप-सी पोर्ट मिळेल. मीडिया रिपोर्टनुसार हा जागतिक बाजारात आलेल्या Infinix InBook X2 चा रीब्रँड व्हर्जन असू शकतो. जागतिक बाजारात या लॅपटॉपची किंमत 30 हजारांपासून सुरु होते.  

Infinix InBook X2 चे स्पेसिफिकेशन्स 

या लॅपटॉपमध्ये 14-इंचाचा फुलएचडी आयपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1,920×1,080 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. या डिस्प्लेचा अस्पेक्ट रेश्यो 16:9 आणि पीक ब्राईटनेस 300 निट्स आहे. इनफिनिक्सच्या या लॅपटॉपमध्ये बॅकलिट चिकलेट कीबोर्ड देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी लॅपटॉपमध्ये ड्युअल बँड Wi-Fi 802.11 ab/b/g/n/ac, Bluetooth v5.1, दोन USB Type-C पोर्ट, दोन USB 3.0 पोर्ट, HDMI 4.1 पोर्ट, SD कार्ड स्लॉट आणि 3.5mm हेडफोन जॅक देण्यात आला आहे. 

Infinix InBook X2 चे तीन मॉडेल सादर करण्यात आले आहेत. यात Intel Core i3-1005G1 प्रोसेसर, Intel Core i5-1035G1 आणि Intel Core i7-1065G7 प्रोसेसरचा समावेश करण्यात आला आहे. हे लॅपटॉप 16GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेजसह विकत घेता येतील. Infinix InBook X2 सीरीजमध्ये लेटेस्ट Windows 11 ऑपरेटिंग सिस्टम मिळेल. तसेच या लॅपटॉपमध्ये 50Wh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 45W चार्जला सपोर्ट करते. ही बॅटरी 11 तास वेब ब्राउजिंगला सपोर्ट करते.   

Web Title: Budget Laptop Infinix Inbook X1 Slim Launching In India On 15th June 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.