7,400 रुपयांपासून किंमत सुरु; Nokia नं सादर केला कंपनीचा सर्वात स्वस्त Smartphone
By सिद्धेश जाधव | Published: January 5, 2022 01:12 PM2022-01-05T13:12:04+5:302022-01-05T13:12:45+5:30
Budget Nokia Phones: बजेट फ्रेंडली Nokia C100 आणि Nokia C200 स्मार्टफोन CES 2022 च्या इव्हेंटमधून सादर करण्यात आले आहेत.
Budget Nokia Phones: Nokia ब्रँडचा मालकी हक्क असणाऱ्या HMD Global नं CES 2022 च्या इव्हेंटमधून अनेक फोन्स सादर केले आहेत. यात Nokia C-series आणि G-series मध्ये प्रत्येकी दोन स्मार्टफोन तर Nokia 2760 Flip देखील सादर केला आहे. या लेखात आपण बजेट फ्रेंडली Nokia C100 आणि Nokia C200 ची माहिती घेणार आहोत.
Nokia C100 आणि Nokia C200 ची किंमत
Nokia C100 कंपनीचा सर्वात स्वस्त Android स्मार्टफोन आहे. ज्याची किंमत 99 डॉलर्स (सुमारे 7,400 रुपये) आहे. तर Nokia C200 ची किंमत 119 डॉलर्स (सुमारे 9,000 रुपये) आहे. सध्या हे फोन्स सीईएस 2022 मध्ये शोकेस करण्यात आले आहेत. परंतु हे फोन भारतासह जगभरात कधी उपलब्ध होतील, याची माहिती मात्र कंपनीनं दिली नाही.
Nokia C100 आणि C200 चे स्पेसिफिकेशन्स
Nokia C100 आणि C200 च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशनमध्ये जास्त अंतर नाही. या दोन्ही नोकिया स्मार्टफोनमध्ये कंपनीनं MediaTek Helio A22 प्रोसेसर दिला आहे. या प्रोसेसरला नोकियानं 3GB रॅम आणि 32GB स्टोरेजची जोड दिली आहे. हे स्मार्टफोन Android 12 वर चालतात.
दोन्ही स्मार्टफोन 4,000mAh च्या बॅटरीसह बाजारात आले आहेत. तसेच यात फोटोग्राफीसाठी सिंगल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. Nokia C200 मध्ये HD+ रेजोल्यूशन असलेला 6.1-इंचाचा डिस्प्ले आहे.
हे देखील वाचा:
WhatsApp Scam 2022: 'सॉरी, तुम्ही कोण?' व्हॉट्सअॅपवरचा हा मेसेज करेल तुमचं बँक अकॉउंट रिकामं