Budget Phone: itel ने सादर केले दोन सुंदर स्मार्टफोन; एंट्री लेव्हल सेगमेंटमध्ये itel A58 आणि itel A58 Pro लाँच
By सिद्धेश जाधव | Published: January 28, 2022 12:06 PM2022-01-28T12:06:03+5:302022-01-28T12:06:16+5:30
Budget Phone itel A58 And itel A58 Pro: itel A58 आणि itel A58 Pro कमी किंमतीत 4000mAh बॅटरी, UNISOC प्रोसेसर, 2GB RAM, 32GB स्टोरेज आणि सुंदर डिजाईनसह सादर करण्यात आले आहेत.
itel ब्रँड एंट्री लेव्हल स्मार्टफोन सादर करण्यासाठी ओळखला जातो. आता कंपनीनं याच सेगमेंटमध्ये दोन नवीन स्मार्टफोन सादर केले आहेत. itel A58 आणि itel A58 Pro नायजेरियात लाँच करण्यात आले आहेत. जे कमी किंमतीत 4000mAh बॅटरी, UNISOC प्रोसेसर, 2GB RAM, 32GB स्टोरेज आणि सुंदर डिजाईनसह सादर करण्यात आले आहेत.
itel A58 आणि itel A58 Pro ची किंमत मात्र कंपनीनं सांगितली नाही. या आठवड्यात सुरु होणाऱ्या विक्रीच्या आधी ही समोर येऊ शकते. फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता या फोन्सची किंमत खूपच कमी असू शकते. हे फोन्स ब्लॅक, ग्रीन आणि पर्पल, अशा तीन रंगात विकत घेता येतील.
itel A58 आणि itel A58 Pro चे स्पेसिफिकेशन्स
हे दोन्ही स्मार्टफोन 6.6-इंचाच्या एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेसह बाजारात आले आहेत. यात फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात LED फ्लॅशसह 5MP चा प्रायमरी कॅमेरा आणि सेकंडरी AI कॅमेरा देण्यात आला आहे. फ्रंट कॅमेऱ्याच्या रिजोल्यूशनची माहिती मात्र अजूनही मिळाली नाही. itel A58 सीरीजच्या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 4,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. सोबत रियर पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर देखील देण्यात आला आहे.
itel A58 आणि itel A58 Pro दोन्ही स्मार्टफोन अँड्रॉइडच्या हलक्या ओएस म्हणजे Android 11 Go Edition वर चालतात. दोन्ही स्मार्टफोनमध्ये 1.3GHz क्लॉक स्पीड असलेला UNISOC SC7731E SoC प्रोसेसर देण्यात आला आहे. itel A58 मध्ये 1GB रॅम आणि 16GB स्टोरेज देण्यात आली आहे. तर itel A58 Pro स्मार्टफोन 2GB रॅम आणि 32GB स्टोरेजसह विकत घेता येईल. दोन्ही स्मार्टफोनमधील स्टोरेज मायक्रोएसडी कार्डनं वाढवता येईल.
हे देखील वाचा: