5000mAh बॅटरीसह आला दमदार स्मार्टफोन; स्वस्तात 90हर्ट्झ रिफ्रेश रेट असलेला स्मूद डिस्प्ले
By सिद्धेश जाधव | Published: January 31, 2022 04:11 PM2022-01-31T16:11:08+5:302022-01-31T16:11:28+5:30
Budget Phone Tecno Spark 8C: स्पार्क 8 लाईनअपमध्ये Tecno Spark 8, 8P, 8 Pro आणि 8T नंतर आता Tecno Spark 8C चा समावेश करण्यात आला आहे. .
Tecno नं नवीन बजेट फ्रेंडली स्मार्टफोन 5000mAh बॅटरीसह सादर केला आहे. कंपनीनं आपल्या स्पार्क 8 लाईनअपमध्ये Tecno Spark 8, 8P, 8 Pro आणि 8T नंतर आता Tecno Spark 8C चा समावेश केला आहे. या लाईनअपमधील हा फोन सध्या भारतात उपलब्ध झाला नाही. परंतु कंपनीचा इतिहास पाहता लवकरच भारतीयांच्या भेटीला हा स्मार्टफोन येईल.
Tecno Spark 8C चे स्पेसिफिकेशन्स
Tecno Spark 8C स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. जो वॉटर ड्रॉप नॉच असलेला हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनमधील प्रोसेसरची माहिती मिळाली नाही. परंतु यात Unisoc T610 चिपसेट असू शकतो. डिवाइसमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात LED फ्लॅश फ्लॅशसह 13 MP प्रायमरी कॅमेरा आणि एक AI लेन्स देण्यात आली आहे. फ्रंटला 8 मेगापिक्सलचा सेल्फी शुटर मिळतो. टेक्नो स्पार्क 8 सी सिक्योरिटीसाठी रियर फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेस अनलॉक फिचर मिळतं. फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
Tecno Spark 8C ची किंमत
Tecno Spark 8C स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट जागतिक बाजारात आले आहेत. यात 2GB आणि 3GB रॅम व्हेरिएंटचा समावेश आहे जे 64GB इंटरनल स्टोरेजसह सादर करण्यात आले आहेत. परंतु दोन्ही मॉडेलची किंमत मात्र कंपनीनं सांगितली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार हा फोन 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत सादर केला जाऊ शकतो.
हे देखील वाचा:
दिसणार नाही सेल्फी कॅमेरा पण झक्कास सेल्फी क्लीक होणार; लाँच झाला धमाल फोन
स्मार्टफोनला कव्हर वापरताय? त्याचे तोटेही अनेक आहेत, समजल्यावर काढून टाकाल...