Budget Phone: वारंवार चार्ज करण्याचं झंझट नाही! हा स्वस्त फोन देणार 38 दिवसांचा बॅकअप, जाणून घ्या वैशिष्ट्ये
By सिद्धेश जाधव | Published: December 15, 2021 03:15 PM2021-12-15T15:15:14+5:302021-12-15T15:15:51+5:30
Budget Phone Tecno Spark 8T: Tecno Spark 8T स्मार्टफोन 50MP Camera, 5000mAh Battery, MediaTek Helio G35 चिपसेट आणि 4GB RAM सह भारतात लाँच झाला आहे.
TECNO नं आज भारतात आपला नवीन बजेट फ्रेंडली स्मार्टफोन सादर केला आहे. Tecno Spark 8T स्मार्टफोनमध्ये कंपनीनं 50MP Camera, 5000mAh Battery, MediaTek Helio G35 चिपसेट आणि 4GB RAM असे फीचर्स देण्यात आले आहेत. टेक्नो स्पार्क 8टी भारतात 8,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या बजेट फोनची विक्री 20 डिसेंबरपासून अॅमेझॉन इंडियावर सुरु होईल.
Tecno Spark 8T चे स्पेसिफिकेशन्स
Tecno Spark 8T स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1080 x 2408 पिक्सल रिजोल्यूशन आणि 20:9 आस्पेक्ट रेशियोसह बाजारात आला आहे. कंपनीने यात वॉटरड्रॉप नॉच डिजाईन आणि 91.30 टक्के स्क्रीन टू बॉडी रेशियो दिला आहे. हा तिन्ही बाजूंनी बेजल लेस असेल डिस्प्ले 401 पीपीआय आणि 500 निट्स ब्राईटनेसला सपोर्ट करतो.
Tecno Spark 8T स्मार्टफोनमध्ये मीडियाटेकचा हीलियो जी35 चिपसेट देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन 4GB RAM आणि 64GB स्टोरेजला सपोर्ट करतो. हा अँड्रॉइड 11 आधारित हायओएस 7.6 वर चालतो. ड्युअल सिम फोन Tecno Spark 8T मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्ससह डीटीएस साउंड देण्यात आला आहे. तसेच यात रियर फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर मिळते. पॉवर बॅकअपसाठी यात फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे, ही बॅटरी 38 दिवसांचा स्टँडबाय टाईम देते, असा दावा कंपनीनं केला आहे.
फोटोग्राफीसाठी यात ड्युअल रियर कॅमेरा मिळतो. ज्यात क्वॉड एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सलच्या सेकंडरी एआय लेन्सचा समावेश आहे. हा टेक्नो स्मार्टफोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्यासह विकत घेता येईल. विशेष म्हणजे फ्रंटला देखील ड्युअल फ्लॅश देण्यात आला आहे.
हे देखील वाचा:
रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण सांगणारे ‘हे’ आहेत बेस्ट स्मार्टवॉच; आधीच देतील आजारांची सूचना
आता घरात कुठेही मिळवा Smart TV ची मजा; चार्जिंग सपोर्टसह आला LG चा भन्नाट टीव्ही