हलक्या-फुलक्या अँड्रॉइड ओएससह आला Tecno POP 5S; बजेटमध्ये ड्युअल रियर कॅमेरा आणि बरंच काही... 

By सिद्धेश जाधव | Published: February 8, 2022 11:45 AM2022-02-08T11:45:32+5:302022-02-08T11:57:12+5:30

Budget Smartphone Tecno Pop 5s: Tecno Pop 5s हा स्मार्टफोन HD+ डिस्प्ले, Unisoc प्रोसेसर, 5MP चा रियर कॅमेरा आणि 3,020mAh च्या बॅटरीसह सादर केला आहे.  

Budget Smartphone Tecno Pop 5s Launched  | हलक्या-फुलक्या अँड्रॉइड ओएससह आला Tecno POP 5S; बजेटमध्ये ड्युअल रियर कॅमेरा आणि बरंच काही... 

हलक्या-फुलक्या अँड्रॉइड ओएससह आला Tecno POP 5S; बजेटमध्ये ड्युअल रियर कॅमेरा आणि बरंच काही... 

Next

Tecno कंपनी आपल्या बेजत फ्रेंडली स्मार्टफोन्ससाठी ओळखली जाते. आता कंपनीनं एक एंट्री लेव्हल स्मार्टफोन आपल्या लोकप्रिय POP सीरिजमध्ये सादर केला आहे. Tecno POP 5, POP 5 Pro, आणि POP 5X नंतर आता Tecno POP 5S नं एंट्री घेतील आहे. हा स्मार्टफोन सध्या मेक्सिकोमध्ये HD+ डिस्प्ले, Unisoc प्रोसेसर, 5MP चा रियर कॅमेरा आणि 3,020mAh च्या बॅटरीसह सादर केला आहे.  

Tecno POP 5S के स्पेसिफिकेशन्स 

Tecno POP 5S स्मार्टफोनमध्ये 5.7-इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले HD+ 720 x 1520 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. या डिस्प्लेमध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी नॉच देण्यात आली आहे. ज्याचा आस्पेक्ट रेशियो 18:9 आणि स्क्रीन टू बॉडी रेशियो 84 टक्के आहे. 

हा स्मार्टफोन 1.4GHz क्वॉड-कोर Unisoc SC98632E प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे. सोबत 3GB RAM आणि 32GB स्टोरेज देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या हलक्या-फुलक्या गो एडिशनसह बाजारात आला आहे, यात Android 10 Go Edition आहे. यात गुगल अ‍ॅप्सचे लाईट व्हर्जन मिळतात,  अन्य अ‍ॅप्स देखील कमी रॅमवर स्मूद चालतात. कनेक्टिव्हिटीसाठी या ड्युअल सिम स्मार्टफोनमध्ये 4G VoLTE, Wi-Fi 802.11 b/g/n, GPS, Bluetooth v4.2, 3.5mm ऑडियो जॅक, FM Radio, आणि microUSB पोर्ट मिळतो. 

फोनच्या मागे ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात LED सह 5MP चा प्रायमरी कॅमेरा आणि एक AI लेन्स देण्यात आली आहे. सेल्फीसाठी 2MP कॅमेरा LED फ्लॅशसह मिळतो. या टेक्नो स्मार्टफोनमध्ये 3,020mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.  

Tecno POP 5S ची किंमत 

Tecno POP 5S स्मार्टफोन मेक्सिकोमध्ये 2,239 MXN (सुमारे 8,081 रुपये) मध्ये सादर केला आहे. ही स्मार्टफोनच्या 3GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत आहे. हा फोन पर्पल आणि ग्रीन कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येईल. सध्या या स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची माहिती मात्र समोर आलेली नाही. 

हे देखील वाचा:

12 वीच्या विद्यार्थ्याने बनवला झोप उडवणारा चष्मा; गाडी चालवताना ड्रायव्हरचा लागू नाही देणार डोळा

इंटरनेटविना जाणून घ्या तुमचा PF अकाऊंटचा बॅलेन्स, फॉलो करा सोप्प्या स्टेप्स

Web Title: Budget Smartphone Tecno Pop 5s Launched 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.