11 हजारांपेक्षा कमी किंमतीत Infinix Hot 11 आणि Hot 11S भारतात लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये

By सिद्धेश जाधव | Published: September 17, 2021 02:59 PM2021-09-17T14:59:17+5:302021-09-17T15:02:55+5:30

Infinix ने भारतात Hot 11 Series अंतर्गत Hot 11 आणि Hot 11S असे दोन स्मार्टफोन सादर केले आहेत.  

Budget smartphones infinix hot 10 and hot 10s launched in India with 90hz display and 50mp camera  | 11 हजारांपेक्षा कमी किंमतीत Infinix Hot 11 आणि Hot 11S भारतात लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये

11 हजारांपेक्षा कमी किंमतीत Infinix Hot 11 आणि Hot 11S भारतात लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये

googlenewsNext
ठळक मुद्देHot 10 च्या बॅक पॅनलवर तिने कॅमेरे देण्यात आले आहेत. Infinix Hot 10 स्मार्टफोन 4GB RAM व 64GB इंटरनल स्टोरेजसह 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Infinix ने भारतात Hot 11 Series अंतर्गत Hot 11 आणि Hot 11S हे दोन स्मार्टफोन्स सादर केले आहेत. या दोन्ही फोन्सची किंमत 11 हजार रुपयांपेक्षा कमी ठेवली आहे. तसेच Infinix Hot 10 हा कंपनीचा पहिला फोन आहे जो 50 मेगापिक्सल रियर कॅमेऱ्यासह सादर झाला आहे. चला जाणून घेऊया या बजेट फ्रेंडली स्मार्टफोन्सचे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत.  

Infinix Hot 11 आणि Hot 11S ची भारतीय किंमत 

Infinix Hot 10 स्मार्टफोन 4GB RAM व 64GB इंटरनल स्टोरेजसह 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा फोन 21 सप्टेंबर 12 वाजल्यापासून 7 Degree Purple, Silver Wave, Emerald Green आणि Polar Black रंगात फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल.  

Infinix Hot 10S मध्ये देखील 4GB RAM आणि 64GB स्टोरेज देण्यात आली आहे, जो 8,999 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. परंतु या फोनच्या सेलची तारीख कंपनीने सांगितली नाही. हा फोन ईकॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध होईल.  

Infinix Hot 11 

या बजेट फोनमध्ये 6.78 इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. पंच-होल डिजाइनसह येणारा हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट आणि 180Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करेल. प्रोसेसिंगसाठी यात MediaTek Helio G88 SoC देण्यात आली आहे. हा अँड्रॉइड 11 बेस्ड XOS 7.6 वर चालतो. सिक्योरिटीसाठी फोनमध्ये फेस अनलॉकसह फिंगरप्रिंट सेन्सर देखील देण्यात आला आहे.  

Hot 10 च्या बॅक पॅनलवर तिने कॅमेरे देण्यात आले आहेत. यातील मुख्य कॅमेऱ्याचे रिजोल्यूशन 50MP आहे. त्याचबरोबर दोन AI कॅमेरे कंपनीने दिले आहेत. या फोनमधील सेल्फी कॅमेरा 8MP च्या रिजोल्यूशनसह येतो. या डिवाइसमध्ये 5,000mAh ची दमदार बॅटरी मिळते. जी USB Type C च्या मदतीने 18W व्हा वेगाने चार्ज करता येते. 

Infinix Hot 11S 

या स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिवाइस MediaTek Helio G70 प्रोसेसरवर चालतो. फोनमध्ये 5,200mAh ची बॅटरी मिळते. या फोनमध्ये Android 11 आधारित कस्टम ओएस देण्यात आला आहे. सिक्योरिटीसाठी यात फेस अनलॉक आणि फिंगरप्रिंट सेन्सर असे दोन्ही फिचर मिळतात. या फोनमधील ड्युअल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 13MP रियर कॅमेरा आणि एक AI कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8MP चा कॅमेरा मिळतो. 

Web Title: Budget smartphones infinix hot 10 and hot 10s launched in India with 90hz display and 50mp camera 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.