तुम्हाला ताप आहे कि नाही सांगणार स्मार्टवॉच; ब्लड प्रेशरची देखील घेणार काळजी, 8 दिवसांचा बॅटरी बॅकअप
By सिद्धेश जाधव | Published: January 13, 2022 05:17 PM2022-01-13T17:17:45+5:302022-01-13T17:17:56+5:30
Budget Smartwatch: Tagg Verve Active स्मार्टवॉच ब्लड प्रेशर मॅपिंग, बॉडी टेम्परेचेर सेन्सर, आणि SpO2 सेन्सर अशा हेल्थ फीचर्ससह सादर करण्यात आला आहे.
Tagg नं भारतात Verve Active नावाचा नवीन Budget Smartwatch सादर केला आहे. यात ब्लड प्रेशर मॅपिंग, बॉडी टेम्परेचेर सेन्सर, आणि SpO2 सेन्सर असे हेल्थ फीचर्स मिळतात. कंपनीनं याचे ब्लॅक, ग्रीन, ग्रे, गोल्ड आणि पर्पल असे पाच कलर व्हेरिएंट सादर केले आहेत. हा स्मार्टवॉच फक्त 3,999 रुपयांमध्ये 14 जानेवारीपासून फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल.
Tagg Verve Active चे स्पेसिफिकेशन्स
Tagg Verve Active वॉच मध्ये 240x280 पिक्सल रेजॉलूशन असलेला 1.7 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा IPS LCD पॅनल आहे जो 80 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो आणि 500 निट्स पीक ब्राईटनेसला सपोर्ट करतो. या स्मार्टवॉचचे वजन 38 ग्राम आहे. यात पाणी आणि धुळीपासून वाचण्यासाठी IP68 रेटिंग देण्यात आली आहे.
हेल्थ आणि फिटनेससाठी या स्मार्टवॉचमध्ये ब्लड ऑक्सीजन मॉनिटर, हार्ट रेट सेन्सर, बॉडी टेम्परेचर ट्रॅकिंग आणि ब्लड प्रेशर मॉनिटर असे फिचर दिले आहेत. तसेच हा वॉच वॉकिंग, रनिंग, योग, बास्केटबॉल आणि स्विमिंगसह अन्य 24 स्पोर्ट्स मोड्सना सपोर्ट करतो. हा स्मार्टवॉच डीप स्लीप सायकल आणि लाईट स्लीप सायक देखील मॉनिटर करतो.
कंपनीनं Tagg Verve Active मध्ये एक पॉवरफुल बॅटरी दिली आहे. जी सिंगल चार्जवर 8 दिवस वापरता येते. हा अंदाज नॉर्मल युजसाठी आहे. हेवी युजर्स देखील चार दिवस चार्जींगविना काढू शकतात, असं कंपनीनं सांगितलं आहे. हा स्मार्टवॉच कंट्रोल करण्यासाठी तुम्ही स्मार्टफोनवर अॅप इन्स्टॉल करू शकता.
हे देखील वाचा:
PF मधील पैसे काढायचे आहेत का? UMANG App वर काही क्लिक्समध्ये होईल काम