एकदा चार्ज करा आणि 3 दिवस विसरून जा; 1700 पेक्षा कमी किंमतीती दमदार साऊंड असलेले TWS Earbuds लाँच 

By सिद्धेश जाधव | Published: February 8, 2022 07:02 PM2022-02-08T19:02:09+5:302022-02-08T19:02:30+5:30

Budget TWS Earbuds Truke Airbuds: Truke Airbuds सिंगल चार्जवर तीन दिवसांचा प्ले बॅक टाइम देऊ शकतात.  

Budget TWS Earbuds Truke Airbuds Launched With Up To 72 Hours Of Playtime  | एकदा चार्ज करा आणि 3 दिवस विसरून जा; 1700 पेक्षा कमी किंमतीती दमदार साऊंड असलेले TWS Earbuds लाँच 

एकदा चार्ज करा आणि 3 दिवस विसरून जा; 1700 पेक्षा कमी किंमतीती दमदार साऊंड असलेले TWS Earbuds लाँच 

Next

Truke भारतात Air Buds आणि Air Buds+ नावाचे दोन TWS Earbuds सादर केले आहेत. यातील ट्रूक एयरबड्सची किंमत 1599 रुपये आहे. तर, एयर बड्स+ 1,699 रुपयांमध्ये विकत घेता येतील. यात IPx4 रेटिंग, 72 तासांचा प्ले बॅक टाइम, 20 प्रीसेट इक्विलायजर, इन-इयर सेन्सर आणि गेमिंग मोड सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. दोन्ही बड्स ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये फ्लिपकार्टवरून विकत घेता येतील.  

स्पेसिफिकेशन्स 

एयर बड्स+ मध्ये कंपनी दमदार साऊंडसाठी 10mm च्या ड्रायव्हरचा वापर करण्यात आला आहे. यात AI पावर्ड नॉइज कॅन्सलेशन फीचर देण्यात आलं आहे. IPX4 रेटिंगसह येणारे हे बड्स सीरी आणि गुगल व्हॉईस असिस्टंटया सपोर्ट करतात. या बड्समध्ये 20 प्री-डिफाइन्ड इक्विलायजर मिळतील, जे चांगला ऑडियो एक्सपीरियंस देतात. 

दोन्ही बड्समध्ये 40-40mAh ची बॅटरी आहे. तसेच चार्जिंग केस 300mAh ची बॅटरीसह येतो. सिंगल चार्जवर हे 72 तासांचा प्ले बॅक टाइम देऊ शकतात, असा दावा कंपनीनं केला आहे.  

ट्रूक एयर बड्समध्ये देखील 20 प्री-डिफाइंड इक्विलायजर 10mm ड्रायव्हर आणि  AI पावर्ड नॉइज कॅन्सलेशन फीचर मिळेल. फक्त यात आयपी रेटिंगचा अभाव दिसत आहे. या बड्समध्ये तुम्हाला सीरी आणि गुगल असिस्टंट सपोर्ट देखील मिळेल. 

हे देखील वाचा:

50-इंचाच्या Smart TV वर आता पर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट; अशी करा Flipkart वरून स्वस्तात खरेदी

युट्युबर बनण्याचं स्वप्न पूर्ण करणार हा फोन; 64MP Selfie Camera असल्यावर प्रोफेशनल Vlog कॅमेऱ्याची गरज नाही

Web Title: Budget TWS Earbuds Truke Airbuds Launched With Up To 72 Hours Of Playtime 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.