व्हाटसअ‍ॅपवर बिझनेस प्रोफाईलची सुविधा 

By शेखर पाटील | Published: August 3, 2017 01:20 PM2017-08-03T13:20:39+5:302017-08-03T13:22:43+5:30

व्हाटसअ‍ॅप हे मॅसेंजर व्यावसायिकांना समोर ठेवून विविध सुविधा देण्याच्या प्रयत्नात असून या अनुषंगाने व्हाटसअ‍ॅपवर बिझनेस प्रोफाईल येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Business profile for WhatsAppApps | व्हाटसअ‍ॅपवर बिझनेस प्रोफाईलची सुविधा 

व्हाटसअ‍ॅपवर बिझनेस प्रोफाईलची सुविधा 

Next

व्हाटसअ‍ॅप हे मॅसेंजर व्यावसायिकांना समोर ठेवून विविध सुविधा देण्याच्या प्रयत्नात असून या अनुषंगाने व्हाटसअ‍ॅपवर बिझनेस प्रोफाईल येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

व्हाटसअ‍ॅप मॅसेंजरच्या विविध फिचर्सविषयी अगदी अचूक माहिती देणार्‍या @WABetaInfo या ट्विटर अकाऊंटने अजून एका महत्वपूर्ण बाबीचा गौप्यस्फोट केला आहे. यानुसार आता व्हाटसअ‍ॅप मॅसेंजर हे व्यावसायिकांसाठी नवीन स्वतंत्र अ‍ॅप सादर करणार असून याचा पहिला टप्पा म्हणून विंडोज प्रणालीच्या युजर्सला बिझनेस प्रोफाईलची सुविधा देण्यात आली आहे. व्हाटपअ‍ॅपचे विंडोजसाठी २.१७.२३४ हे अपडेट सादर करण्यात आले असून यात ही प्राथमिक स्वरूपातील सुविधा आहे. तर अँड्रॉइडच्या २.१७.२८५ या ताज्या अपडेटमध्येही याचा अंतर्भाव करण्यात आला आहे. अर्थात आगामी स्वतंत्र अ‍ॅपमध्ये याचा विस्तार करण्यात येणार असल्याची बाब उघड आहे. व्हाटसअ‍ॅपच्या आगामी अ‍ॅपमध्ये व्यावसायिकांसाठी ‘व्हेरिफाईड’ आणि ‘नॉन-व्हेरिफाईड’ असे दोन प्रकार असतील. यासाठी फेसबुकच्या व्हेरिफाईड अकाऊंटसाठी असणार्‍या बरोबरच्या चिन्हाची इमोजी प्रदान करण्यात येणार असल्याचा दावा आधी @WABetaInfo यांच्यातर्फे करण्यात आला होता. तथापि, अँड्रॉइड व विंडोजच्या ताज्या अपडेटमध्ये अशी सुविधा नसेल हे स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय अनव्हेरिफाईड अकाऊंटला नाव, प्रोफाईल फोटो आणि थोडक्यात परिचयाची सुविधा असेल. यात दूरध्वनी/मोबाईल क्रमांक, वेबसाईट, ई-मेल आदी टाकण्याचीही व्यवस्था असेल. विशेष म्हणजे यावर पहिले व्हेरिफाईड बिझनेस प्रोफाईल हे अर्थातच खुद्द व्हाटसअ‍ॅपचेच असेल ही बाबही सूर्यप्रकाशाइतकी सत्य आहे. सध्या तरी हे पेज कुणाला दिसत नसले तरी @WABetaInfo या अकाऊंटने याचा स्क्रीनशॉट जारी केला आहे हे विशेष!

व्हाटपअ‍ॅप मॅसेंजर गेल्या अनेक महिन्यांपासून कमाईचे नवनवीन मार्ग शोधण्यात व्यस्त असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. जगभरात तब्बल १२० कोटींपेक्षा जास्त लोक या मॅसेंजरचा वापर करत असले तरी यापासून याची मूळ मालकी असणार्‍या फेसबुकला फार काही कमाई झालेली नाही. या पार्श्‍वभूमिवर आगामी काळात व्यवसायकेंद्रीत फिचर्सच्या माध्यमातून उत्पन्नाचे मार्ग शोधण्यात येतील हे बिझनेस प्रोफाईल या फिचर्सच्या माध्यमातून स्पष्ट झाले आहे.

Web Title: Business profile for WhatsAppApps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.