38 हजार रुपयांचा फोन फक्त 5999 मध्ये खरेदी करा; Nothing Phone (1) वर मिळतोय बम्पर डिस्काउंट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 20:28 IST2023-01-11T20:27:03+5:302023-01-11T20:28:25+5:30
नथिंगच्या या एकमेव स्मार्टफोनला त्याचे डिझाईन इतर फोनच्या तुलनेत विशेष बनवते. या पारदर्शक रिअर पॅनल फोनमध्ये खास Gluph इंटरफेस LED लाइट्स देण्यात आले आहेत.

38 हजार रुपयांचा फोन फक्त 5999 मध्ये खरेदी करा; Nothing Phone (1) वर मिळतोय बम्पर डिस्काउंट!
अमेरिक टेक कंपनी Nothing ने आतापर्यंत केवळ एकच स्मार्टफोन लॉन्च केला आहे आणि या फोनने ग्लोबल मार्केटमध्ये येताच धुमाकूळ घातला आहे. महत्वाचे म्हणजे, हा फोन त्याच्या प्राईस सेग्मेंटमध्ये सर्वाधिक विकला गेलेला फोन ठरला आहे. आता हा फोन फारच कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळत आहे. हा फोन मोठ्या डिस्काउंटनंतर, 10,000 रुपयांपेक्षाही कमी किंमतीत विकत घेतला जाऊ शकतो.
नथिंगच्या या एकमेव स्मार्टफोनला त्याचे डिझाईन इतर फोनच्या तुलनेत विशेष बनवते. या पारदर्शक रिअर पॅनल फोनमध्ये खास Gluph इंटरफेस LED लाइट्स देण्यात आले आहेत. शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart वर साधारणपणे 38,000 रुपयांचा हा नथिंग फोन (1) आता केवळ 6,000 रुपयांपेक्षाही कमी किंमतीत मिळत आहे.
बम्पर डिस्काउंटवर असा खरेदी करा हा पारदर्शी स्मार्टफोन -
Nothing Phone (1) च्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेला या एकमेव व्हेरिअंटची किंमत भारतात 37,999 रुपये ठेवण्यात आली आहे. फ्लिपकार्टवर 31 पर्सेंट डिस्काउंटसह हा फोन 25,999 रुपयांना लिस्ट करण्यात आला आहे. ICICI बँक, Citi बँक आणि Flipkart Axis बँक कार्डच्या सहाय्याने बील केल्यास या फोनवर 10 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त सूटही दिली जात आहे.
जुना फोन एक्सचेन्ज केल्यानंतर फ्लिपकार्ट आपल्या ग्राहकांना 20,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेन्ज डिस्काउंट देखील देत आहे. या ऑफर्सचा संपूर्ण लाभ मिळाल्यास हा फोन 6,000 रुपयांपेक्षाही कमी किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो. एवढेच नाही तर, एक्सचेन्ज ऑफरचा पूर्ण फायदा मिळाला नाही, तरीही हा फोन 10,000 रुपयांपेक्षाही कमी किंमतीत आपला होऊ शकतो.