Apple च्या अधिकृत स्टोरवरच कमी झाली iPhone 12 ची किंमत; फ्लिपकार्ट-अ‍ॅमेझॉनवरही मिळणार नाही इतकी सूट 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 01:20 PM2022-04-04T13:20:15+5:302022-04-04T13:20:28+5:30

अ‍ॅमेझॉन किंवा फ्लिपकार्ट नव्हे तर Apple च्या अधिकृत स्टोरवर iPhone 12 ची किंमत कमी करण्यात आली आहे.  

Buy Apple iPhone 12 With Huge Discount From India iStore  | Apple च्या अधिकृत स्टोरवरच कमी झाली iPhone 12 ची किंमत; फ्लिपकार्ट-अ‍ॅमेझॉनवरही मिळणार नाही इतकी सूट 

Apple च्या अधिकृत स्टोरवरच कमी झाली iPhone 12 ची किंमत; फ्लिपकार्ट-अ‍ॅमेझॉनवरही मिळणार नाही इतकी सूट 

googlenewsNext

Apple चे नवीन आयफोन बाजारात आले कि जुन्या मॉडेल्सची किंमत कमी होते. त्यामुळे आयफोनचे चाहते अशा संधीची वाट बघत असतात. तुम्ही देखील अ‍ॅप्पल iPhone 12 विकत घेण्याचा विचार करत असाल तर कंपनीच्या अधिकृत डिस्ट्रिब्युटरनेच चांगली संधी दिली आहे. India iStore तुम्ही हा डिवाइस जवळपास अर्ध्या किंमतीत विकत घेऊ शकता. चला जाऊन घेऊया ही भन्नाट ऑफर.  

iPhone 12 वरील डिस्काउंट  

IPhone 12 च्या 64GB या बेस व्हेरिएंटची मूळ किंमत 65,900 रुपये आहे. परंतु जर तुम्ही iStore वरून हा डिवाइस विकत घेतल्यास तुम्हाला 5000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. तसेच HDFC बँकेच्या कार्ड धारकांना 4000 रुपयांचा कॅशबॅक देखील दिला जात आहे. परंतु इथेच ही ऑफर संपत नाही.  

अ‍ॅप्पलच्या अधिकृत स्टोरवर देखील तुम्हाला जुना स्मार्टफोन देऊन आणखी बचत करता येते. विशेष म्हणजे हा डिस्काउंट अन्य वेबसाईटच्या तुलनेत जास्त असतो. iPhone 12 स्मार्टफोनवर 18000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. त्यामुळे या स्मार्टफोनची प्रभावी किंमत 38,990 रुपये होते.  

iPhone 12 चे स्पेसिफिकेशन्स  

iPhone 12 हा मोबाईल 6.1-इंचाच्या सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्लेसह सादर करण्यात आला आहे. ज्यात A14 बायोनिक चिप देण्यात आली आहे. मागे ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात दोन्ही सेन्सर्स 12MP चे आहे. फ्रंटला देखील 12MP चा सेल्फी कॅमेरा आहे. हा एक 5G स्मार्टफोन आहे जो ड्युअल सिमला सपोर्ट करतो. 

Web Title: Buy Apple iPhone 12 With Huge Discount From India iStore 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.