4,500 रुपयांत Jio आणि Google नं बनवलेला स्मार्टफोन; JioPhone Next वर आतापर्यंतचा मोठा डिस्काउंट 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 11:59 AM2022-05-17T11:59:19+5:302022-05-17T11:59:53+5:30

JioPhone Next स्मार्टफोनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट दिला जात आहे.  

Buy JioPhone Next At Rs 4499 For First Time   | 4,500 रुपयांत Jio आणि Google नं बनवलेला स्मार्टफोन; JioPhone Next वर आतापर्यंतचा मोठा डिस्काउंट 

4,500 रुपयांत Jio आणि Google नं बनवलेला स्मार्टफोन; JioPhone Next वर आतापर्यंतचा मोठा डिस्काउंट 

Next

JioPhone Next स्मार्टफोन जेव्हा लाँच झाला होता, तेव्हा जियोनं हा जगातील सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन असल्याचा दावा केला होता. कंपनीनं या फोनसाठी टेक दिग्गज कंपनी गुगलशी भागीदारी केली होती. तसेच क्वॉलकॉम कंपनीच्या प्रोसेसरचा वापर करण्यात आला होता. आता प्रथमच JioPhone Next वर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. त्यामुळे हा फोन आता फक्त 4,499 रुपयांमध्ये विकत घेता येत आहे.  

JioPhone Next वरील ऑफर 

JioPhone Next भारतात 6,499 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. आता या स्मार्टफोनवर कंपनीकडून 2,000 रुपयांची सूट दिली जात आहे. ही सवलत मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त जुना डिवाइस एक्सचेंज करावा लागेल. त्यामुळे या हँडसेटची किंमत 4,499 रुपये होते. लाँचनंतर पहिल्यांदाच जियोफोन नेक्स्टवर असा डिस्काउंट दिला जात आहे.  

Jio Phone Next Specification  

या फोनमध्ये 5.45-इंचाचा (720 X 1440 पिक्सल) एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले कोर्निंग गोरिल्ला ग्लास-3 सह येतो. फोनमध्ये 2 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल मेमरी मिळते. ही मेमरी 512जीबी पर्यंत मायक्रोएसडी कार्डनं वाढवता येते. या फोनमध्ये प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन क्यूएम 215 चिपसेट देण्यात आला आहे.  

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा रियर आणि 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. Jio Phone Next मध्ये 3500एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. जियोफोन नेक्स्ट गुगल अँड्रॉइडने बनवलेल्या प्रगती ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. तसेच यात अनेक जियो आणि गुगल अ‍ॅप्स प्रीलोडेड मिळतात.      

Web Title: Buy JioPhone Next At Rs 4499 For First Time  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.