स्टोरेज कमी पडतेय? फक्त 5200 रुपयांमध्ये 128GB स्टोरेज असलेला Oppo चा फोन आणा घरी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 06:20 PM2022-02-21T18:20:04+5:302022-02-21T18:20:19+5:30
Oppo F19s Offer: थेट डिस्काउंट, बँक ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफर्सचा वापर केल्यास Oppo F19s स्मार्टफोन तुमच्या बजेटमध्ये येईल.
फ्लिपकार्टवर नेहमीच स्मार्टफोन्सवर काही ना काही ऑफर्स सुरु असतात. अशीच एक ऑफर तुम्हाला 23,000 रुपयांच्या आसपासचा स्मार्टफोन 6000 पेक्षा कमीमध्ये विकत घेण्याची संधी देत आहे. थेट डिस्काउंट, बँक ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफर्सचा वापर केल्यास Oppo F19s स्मार्टफोन तुमच्या बजेटमध्ये येईल. चला जाणून घेऊया फ्लिपकार्टवरील ऑफर्स आणि स्मार्टफोनचे स्पेक्स.
Oppo F19s ची किंमत आणि ऑफर
Oppo F19s च्या एकमेव 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजची किंमत 22,990 रुपये आहे. परंतु फ्लिपकार्टकडून मिळालेल्या 13 टक्के सवलतीनंतर हा डिवाइस 19,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून 14,800 रुपयांची बचत करू शकता. त्यामुळे Oppo F19s ची प्रभावी किंमत 5,190 रुपये होईल. तसेच Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डवर 5 टक्के अनलिमिटेड कॅशबॅक देखील मिळेल.
OPPO F19s चे स्पेसिफिकेशन्स
ओप्पो एफ19एस मध्ये 6.43-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. पंच-होल डिस्प्ले डिजाईनसह सादर करण्यात आलेला हा डिस्प्ले 2400 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन, 60Hz रिफ्रेश रेट आणि 180Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. हा एक अॅमोलेड पॅनल आहे त्यामुळे यात इन-डिस्प्ले फिंगप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.
या ओप्पो मोबाईलमध्ये क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 662 चिपसेटचा वापर कंपनीने केला आहे. OPPO F19s अँड्रॉइड 11 आधारित कलरओएस 11 वर चालतो. त्याचबरोबर यात 6GB रॅम आणि 5GB एक्सटेंडेड रॅम देण्यात आला आहे. या फोनमध्ये 128GB इंटरनल स्टोरेज आहे.
OPPO F19s मधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 48MP चा मुख्य सेन्सर, 2MP चा डेप्थ सेन्सर आणि 2MP ची मॅक्रो लेन्स मिळते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 16MP फ्रंट कॅमेरा मिळतो. पॉवर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी SuperVOOC 2.0 टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.
हे देखील वाचा:
- लॅपटॉपच्या तोडीची टॅबलेट सीरिज भारतात लाँच; इतकी आहे Samsung Galaxy Tab S8 Series ची किंमत
- विमान प्रवासात पावर बँक चेक-इन बॅग ऐवजी केबिन बॅगमध्ये ठेवायला का सांगतात? जाणून घ्या महत्वाची माहिती