कमी खर्चात बनवा चोरांना ‘उल्लू’; वाय-फाय किंवा विजेची गरज नसलेला सीसीटीव्ही कॅमेरा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 05:14 PM2022-03-22T17:14:38+5:302022-03-22T17:15:23+5:30
सीसीटीव्ही कॅमेरा खूप महाग असतो. फक्त कॅमेरा घेऊन उपयोग नाही तर त्यासाठी तुम्हाला वीज, वाय-फाय इत्यादींचा देखील खर्च करावा लागतो.
घरात चोर शिरण्याची भीती तर असते. त्यामुळे लोक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर घर सुरक्षित ठेवण्यासाठी करतात. परंतु बाजारात उपलब्ध असलेले सीसीटीव्ही कॅमेरे खूप महाग आहेत, सर्वांनाच ते परवडत नाहीत. तसेच या कॅमेऱ्यांना वीज आणि वाय-फायची देखील गरज असते. परंतु याची गरज नसलेला कॅमेरा मिळाला तर? आणि तोही 300 रुपयांपेक्षा कमी मध्ये.
चोरांना दाखवा भीती
आम्ही अशा डिवाइस बद्दल बोलत आहोत जो सीसीटीव्ही कॅमेरा नाही. तो डमी म्हणजे नकली सीसीटीव्ही कॅमेरा आहे. जो तुम्ही 300 रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घेऊ शकता. हा डिवाइस हुबेहूब सीसीटीव्ही कॅमेऱ्यासारखा दिसतो. यात एक लाईट देखील पेटत राहते त्यामुळे हा कॅमेरा ऑन आहे, असं चोरांना वाटतं.
या डमी सीसीटीव्ही कॅमेऱ्यासोबत एक पेन्सिल बॅटरी आणि काही स्क्रूज मिळतात. तुम्ही स्वतः हा कॅमेरा तुमच्या घरात किंवा बाहेर फिट करू शकता. अजून खराखुरा वाटावा म्हणून सोबत एक वायरही मिळते. हा प्लास्टिकपासून बनला आहे तरीही दुरून धातूपासून बनल्यासारखा वाटतो. जर तुम्हाला चोरांना किंवा शेजाऱ्यांना आपल्या घरातील किंवा घराबाहेरील वस्तुंना हात लावू द्यायचा नसेल तर तुम्ही हा कॅमेरा घेऊ शकता. हा डमी सीसीटीव्ही कॅमेरा फ्लिपकार्टवरून फक्त 295 रुपयांमध्ये विकत घेता येईल.