20 हजारांचा फोन फक्त 2 हजारांत; 5000mAh ची बॅटरी असलेल्या Vivo फोनवर जबरदस्त ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 12:14 PM2022-06-25T12:14:25+5:302022-06-25T12:14:44+5:30
4GB रॅम असलेला Vivo Y21 स्मार्टफोन 20 हजार रुपयांच्या ऐवजी 2 हजार रुपयांमध्ये मिळत आहे.
Vivo Y21 ने स्मार्टफोन गेल्यावर्षी भारतात मीडियाटेक हीलियो P35 चिपसेट आणि 5000mAh च्या बॅटरीसह लाँच झाला आहे. लाँचच्या वेळी या हँडसेटची किंमत 20,000 रुपयांच्या आसपास ठेवण्यात आली आहे. परंतु आता हा मोठी बॅटरी असलेला विवोस्मार्टफोन फक्त 2000 रुपयांमध्ये विकत घेण्याची संधी मिळत आहे. Vivo Y21 स्मार्टफोन इतक्या स्वस्तात अॅमेझॉनवर उपलब्ध झाला आहे.
Vivo Y21 ची किंमत झाली कमी
मीडियाटेक हीलियो P35 चिपसेट आणि 5000mAh ची बॅटरी स्मार्टफोनचा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज असलेला मॉडेल 19,990 रुपयांच्या ऐवजी आता 13,269 रुपयांमध्ये विकला जात आहे. अॅमेझॉन या फोनवर थेट 6,721 रुपयांचा डिस्काउंट देत आहे. ईएमआय ट्रांजेक्शनसाठी यस बँक, स्टँडर्ड चार्टर्ड किंवा एचएसबीसी क्रेडिट कार्डचा वापर केल्यास 2000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल. तसेच तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून 9200 रुपयांपर्यंतची बचत करू शकता. त्यामुळे Vivo Y21 ची किंमत फक्त 2069 रुपये होईल.
Vivo Y21 चे स्पेसिफिकेशन्स
Vivo Y21 मध्ये कंपनीने 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले दिला आहे. हा एक वॉटरड्रॉप नॉच असलेला एलसीडी पॅनल आहे. जो 20:9 अस्पेक्ट रेशियो आणि 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशनआला सपोर्ट करतो. या विवो फोनमध्ये मीडियाटेकचा हीलियो पी35 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 वर आधारित फनटच ओएस 11.1 वर चालतो. हा फोन 4GB रॅम + 1GB एक्सटेंडेड रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.
Vivo Y21 च्या बॅक पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतो. या सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर देण्यात आला आहे. त्याचबरोबर कंपनीने 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर दिला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या विवो फोनमध्ये 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा मिळतो. साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर असलेला हा फोन 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो.