पबजी खेळून कंटाळा आलाय? Call of Duty चा नवीन मोबाईल गेम येतोय; कंपनीनं देतेय नोकरीची संधी
By सिद्धेश जाधव | Published: March 12, 2022 12:46 PM2022-03-12T12:46:03+5:302022-03-12T12:46:14+5:30
Activision कंपनीनं Call of Duty: Warzone Mobile गेमची घोषणा केली आहे. यासाठी कंपनीनं हायरिंग सुरु केली आहे.
Activision कंपनी आपल्या लोकप्रिय व्हिडीओ गेम Call of Duty Warzone च्या मोबाईल व्हर्जनवर काम करत असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. आता कंपनीनं या बातमीला दुजोरा दिला आहे. कंपनीचा COD Mobile गेम BGMI आणि PUBG Mobile ला टक्कर देत आहे. तर आगामी नवीन गेम PUBG New State ला पर्याय म्हणून सादर केला जाऊ शकतो. यासाठी कंपनीनं लोकांना कामावर ठेवण्यास देखील सुरुवात केली आहे.
हायरिंगची घोषणा
Activision नं आपल्या ट्विटर अकॉउंटवरून Call of Duty: Warzone च्या मोबाईल व्हर्जनची घोषणा केली आहे. त्यासाठी आवश्यक गेम डेव्हलपमेंट आणि पब्लिशिंग टीमची हायरिंग कंपनीनं सुरु केली आहे. ट्वीटमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या जॉब ओपनिंगची माहिती मिळवू शकता. यात नेटवर्क प्रोग्रामर्स, सिस्टम प्रोग्रामर्स, UI प्रोग्रामर्स, UI आर्टिस्ट्स, सीनियर प्रोड्यूसर, प्रोड्यूसर, असिस्टंट प्रोड्यूसर, सीनियर प्रोडक्ट मॅनेजर आणि प्रोडक्ट मॅनेजर रोल्ससाठी माणसं आवश्यक आहेत.
Activision नं सांगितलं कि, Solid State Studios, Beenox, Digital Legends आणि Demonware सारख्या कंपनीच्या इंटरनल स्टूडियोजमध्ये देखील अनेक जॉब ओपनिंग आहेत. या जॉब्ससाठी अप्लाय करण्यासाठी तुम्ही careers.activision.com पोर्टलवर जाऊ शकता.
हे देखील वाचा:
- स्वस्तात घेऊन टाका 5000mAh बॅटरी असलेला स्मार्टफोन; Realme C35 चा पहिला सेल आज
- बजेट सेगमेंटमधील वातावरण तापणार; रियलमी-रेडमीनंतर ‘या’ कंपनीच्या स्वस्त 5G फोनची होतेय भारतात एंट्री
- बंद करून सुरु केल्यावर बिघडलेला कंप्यूटर चांगला कसा होतो?