आयफोनवर व्हॉट्सअॅप स्टीकर अॅप वापरू शकणार नाहीत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 15:16 IST2018-11-19T15:15:25+5:302018-11-19T15:16:44+5:30
स्टीकर फीचर आणल्यानंतरच या थर्डपार्टी कंपन्यांनी ही अॅप प्लेस्टोअर आणि अॅप स्टोअरवर आणली होती.

आयफोनवर व्हॉट्सअॅप स्टीकर अॅप वापरू शकणार नाहीत...
नवी दिल्ली : कमी कालावधीत लोकप्रिय झालेले व्हॉट्सअॅप युजरना खिळवून ठेवण्यासाठी नवनवीन फिचर आणत असते. नुकतेच इमोजीसारखे स्टीकर नावाचे फिचर आणले होते. अल्पवधीत लोकप्रिय बनलेल्या या स्टीकरला बनविण्यासाठी तसे कष्ट पडतात. हे काम सोपे करण्यासाठी काही कंपन्यांनी स्टीकर बनविण्याचे अॅपच विकसित केले होते. या अॅपवर अॅपल कंपनीने बंदी आणली आहे. यामागे फेसबुक वाद नसून नियम भंग केल्याने ही अॅप अॅप स्टोअरमधून काढून टाकले आहेत.
स्टीकर फीचर आणल्यानंतरच या थर्डपार्टी कंपन्यांनी ही अॅप प्लेस्टोअर आणि अॅप स्टोअरवर आणली होती. स्व:ताचा फोटोपासून स्टीकर बनवायचा असल्यास या अॅपवर फोटो घेऊन ते पीएनजीमध्ये कन्हर्ट करावे लागते. त्यानंतर हे फोटो स्टीकर म्हणून वापरता येतात.
अशा अॅपनी अॅपलच्या नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांना अॅपस्टोअरवरून हटविण्यात आले आहे. याबाबतची माहिती WABetaInfo दिली आहे. यावर अद्याप व्हाट्सअॅपने कोणतीही प्रतिक्रीया दिलेली नसली तरीही फेसबुक आणि अॅपलचे सीईओ यांच्यामध्ये चाललेल्या वादातून हे पाऊल उचलण्यात आल्याची शक्यता आहे.
iOS च्या नियमावलीनुसार फोनमध्ये स्टीकर्ससाठी वेगळे अॅप इन्स्टॉल करावे लागते. या अॅपद्वारे स्टीकर व्हॉट्सअॅपमध्ये घेता येतात. मात्र, या अॅपनी या नियमाचे उल्लंघन केले आहे.